गौरी बांदेकर रिल्स ग्रुप 
राज्यस्तर स्पर्धेत प्रथम

गौरी बांदेकर रिल्स ग्रुप राज्यस्तर स्पर्धेत प्रथम

Published on

83262
भारती परब, गजेंद्र कोठावळे, गौरी बांदेकर, अवंती पंडित, अंकिता पवार


राज्यस्तरीय रील्स स्पर्धेत
गौरी बांदेकर ग्रुप प्रथम

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ ः कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आयोजित ‘चला मराठी बोलूया’ या विषयावरील राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेमध्ये येथील गौरी बांदेकर रिल्स ग्रुपने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या रिल्समध्ये गौरी बांदेकर, अवंती पंडित, भारती परब, गजेंद्र कोठावळे, अंकिता पवार यांनी अभिनय साकारला आहे. यामध्ये दिग्दर्शन, संकल्पना, संवाद, एडिटिंग या सर्व बाजू गौरी बांदेकर यांनी सांभाळल्या आहेत. यापूर्वीही गौरी बांदेकर रिल्स ग्रुपने विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या रिल्स ग्रुपमधील प्रत्येक कलाकार हा गायन, अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. या यशाबद्दल या ग्रुपवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा आघाडीचा रिल्स ग्रुप असून, आतापर्यंत शेकडो रिल्स त्यांनी केले आहेत. समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर त्यांनी रिल्सच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला आहे. अनेक रिल्समधून सामाजिक संदेश देखील देण्याचे काम केले असून, या रिल्सना अनेकांनी पसंती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.