Konkan Railway : कोकण रेल्वे हाऊसफुल्ल; चाकरमान्यांनी धरली परतीच्या प्रवासाची वाट, तिकिटासाठी मोठ्या रांगा
मुंबईहून येणाऱ्या व जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्यांच्या तिकिटांची प्रतीक्षा यादी सरासरी साडेतीनशे ते चारशेच्या जवळपास आहे.
खेड : सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू असल्याने मुंबईकर चाकरमानी (Mumbai Chakarmani) मोठ्या प्रमाणात कोकणात आपल्या मूळगावी दाखल होत आहेत. काही चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासाची वाट धरली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. महिनाभर बहुतांश रेल्वे गाड्यांचे तिकीट बुकिंग फुल्ल झाले असून, बहुतांश गाड्यांची तिकिटे सरासरी साडेतीनशे ते चारशेच्या आसपास प्रतीक्षेत आहेत, तर काही गाड्यांची वेटिंग लिस्टही फुल्ल झाल्याने बुकिंग बंद केले आहे.
रेल्वे स्थानकावरील तिकीट केंद्रावर प्रवाशांची (Passengers) तिकिटांसाठी मोठी गर्दी आहे. खासगी आराम बस, अन्य खासगी वाहनांनी गावी येणाऱ्यापेक्षा कोकण रेल्वेने (Konkan Railway) येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे गाड्या सध्या हाऊसफुल्ल आहेत. बहुतांश रेल्वे गाड्यांचे तिकीट एक-दोन महिने आधीच बुकिंग केली आहेत. बरेचजण एक दिवस आधी तत्काळ तिकिटे काढून गावी दाखल होत आहेत.
मुंबईहून येणाऱ्या व जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्यांच्या तिकिटांची प्रतीक्षा यादी सरासरी साडेतीनशे ते चारशेच्या जवळपास आहे. एप्रिलच्या गावी आलेले चाकरमानी मुंबईला परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे त्यांचीही तिकिटांसाठी गर्दी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.