आँन्को लाईफकेअर कँन्सर सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टर

आँन्को लाईफकेअर कँन्सर सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टर

Published on

३३ ( पान ५ साठी)

‘आँन्को कँन्सर सेंटर’मध्ये तज्ज्ञ डॉक्टर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः वेळीच निदान आणि उपचाराने कर्करोगावर मात करणे शक्य आहे. आँन्को लाईफकेअर कँन्सर सेंटर हे नेहमीच ग्रामीण भागातील रूग्णांना आधुनिक वैद्यकीय सुविधा पुरवत असून अनुभवी तज्ज्ञ डाँक्टरांकडून मार्गदर्शन आणि उपचार केले जातात. येथे तज्ञ डॅा. अव्दैत गोरे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आणि डॅा विक्रम घाणेकर, हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट यांची मासिक ओपीडी सुरू केली असून येत्या १९ मे रोजी पुन्हा या तज्ज्ञाकडून तपासून घेण्याची संधी रूग्णांना मिळणार आहे.
कॅन्सर होऊन मृत्यू पावणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. कॅन्सरविषयक अज्ञान, गैरसमज, भीती, अशिक्षितपणा ही याची प्रमुख कारणे आहेत. परंतु कॅन्सर होऊ नये यासाठी आवश्यक त्या तपासण्या वेळच्या वेळी केल्या तर कॅन्सरला प्रतिबंध करता येतो. त्यामुळे कॅन्सर झाल्यानंतर त्याच्याशी लढण्यापेक्षा तो होऊ नये याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.
दूरवरून रुग्ण या तज्ज्ञांचा विशेष सल्ला घेण्यासाठी येत आहेत. याबाबत नागरिकांमध्ये अधिक जागरुकता पसरविण्यासाठी चिपळूणच्या ऑन्को लाईफकेअर कँन्सर सेंटर येथे १९ मे रोजी नागरिकांना पुन्हा एकदा ओपीडी सेवेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com