Konkan Rain : वादळी पावसाचा खेड, चिपळूणला तडाखा; आंबा पिकांचे मोठे नुकसान, महाकाय वृक्ष कोसळले
खराब हवामानामुळे यावर्षी आंबा-काजू ही पिके धोक्यात आली आहेत. चिपळूण तालुक्यात मागील आठवड्यात येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
खेड, चिपळूण : खेड शहरासह ग्रामीण भाग आणि चिपळूण (Chiplun) शहरासह तालुक्यातील सावर्डे, पूर्व विभाग, पंधरागाव व खाडीपट्ट्यात वादळी पावसाचा (Konkan Rain) तडाखा बसला. वादळात खेड-दापोली मार्गासह शहरातील विविध भागांत महाकाय वृक्ष कोसळले. दुकाने, घरे यांसह निवासी संकुलांचेदेखील वादळात नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे व कौले उडून नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी विद्युतवाहिन्या व पोलवर झाडांच्या फांद्या कोसळून नुकसान झाले. परिणामी, तीन तास शहरासह परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. खेडमध्ये दुपारी झालेल्या पाऊस व वादळाने मोठे नुकसान केले आहे. खेड-दापोली मार्गावर खेड पंचायत समितीसमोर (Khed Panchayat Samiti) महाकाय वृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक सुमारे अर्ध्या तासाने पूर्ववत करण्यात यश आले.
या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या टेलिफोन एक्स्चेंजच्या बाजूलाच एक दुसरे मोठे झाड कोसळले. शहरातील स्वरूपनगर भागात देखील झाड कोसळले असून, अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वीजवाहिन्यांवर कोसळल्या. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला असून, महावितरणचे कर्मचारी विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. वादळासह तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबापिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यासह सुमारे तासभर पडलेल्या पावसाने दाणादाण उडवली.
खराब हवामानामुळे यावर्षी आंबा-काजू ही पिके धोक्यात आली आहेत. चिपळूण तालुक्यात मागील आठवड्यात येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आज पुन्हा संपूर्ण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाचा सर्वाधिक फटका सावर्डे, दसपटी तसेच चिपळूण शहर परिसराला बसला. सावर्डे धनगरवाडी येथे वादळामुळे बबन बाबू बावदाने यांचा गोठा कोसळून चार जनावरे दगावली आहेत. त्यांचे एकूण ५ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले सावर्डे बौद्धवाडी येथील योगेश सावंत यांच्या घरावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले.
दोघे जण बचावले
प्रकाश कदम यांच्या बागेचेही वादळीवाऱ्याने मोठे नुकसान झाले. शहरातील गोवळकोट रोड येथील श्री देवी करंजेश्वरी कमानीजवळ झाड पडल्यामुळे विद्युतखांब कोसळला. तसेच या भागातील विद्युत वाहिन्याही तुटल्या. रस्त्यावर झाड कोसळल्याने या भागातील वाहतूक काही वेळ बंद पडली होती. बाजारपेठेतील स्वामी कॉप्लेक्सचे पत्रे उडून नुकसान झाले. पत्रे उडाले त्यावेळी दोघे जण त्यातून सुदैवाने बचावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.