‘अटल मॅरेथॉन’मध्ये देशपातळीवर
विश्वजीत परीटचा प्रोजेक्ट अव्वल

‘अटल मॅरेथॉन’मध्ये देशपातळीवर विश्वजीत परीटचा प्रोजेक्ट अव्वल

Published on

84216
विश्वजीत परीट


‘अटल मॅरेथॉन’मध्ये विश्वजीतचा प्रोजेक्ट देशपातळीवर अव्वल

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः येथील हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजच्या विश्वजीत परीटने नीती आयोग व अटल इनोव्हेशन मिशन आयोजित अटल मॅरेथॉनमध्ये विश्वजीत परिटच्या प्रोजेक्टला देश पातळीवर दैदिप्यमान यश मिळाले आहे. ‘कारखान्यांच्या परिसरातील होणाऱ्या हवेच्या प्रदूषणावरील उपाय’, अशा संकल्पनेवर आधारित हा प्रोजेक्ट आहे.
या मॅरेथॉनमधून देशातून चारशे कल्पना निवडल्या होत्या. तर महाराष्ट्रातून आठ कल्पना निवडण्यात आल्या. त्यामध्ये विश्वजीतचा समावेश होता. त्यानंतर बारामती या ठिकाणी स्टुडन्ट इंटरशिप प्रोग्रम डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आला होता व तिथे पुनर्मूल्यमापन होऊन ४०० संकल्पनेंमधून १०० प्रकल्प निवडण्यात आले. त्यामध्ये राज्यात दुसरा तर देशात बारावा म्हणून विश्वजीतच्या प्रकल्पाची निवड होऊन दिल्ली या ठिकाणी स्टुडन्ट इंटरप्रनर्शिप प्रोग्रॅमसाठी प्रोजेक्टची निवड झाली आहे. कारखान्यांच्या परिसरातील होणाऱ्या हवेच्या प्रदूषणावरील उपाय अशा संकल्पनेवर आधारित विश्वजीतचा प्रोजेक्ट आहे. धुराड्यातून बाहेर पडणाऱ्या धुरातील कार्बनचे कण पाण्यामार्फत गोळा करण्याची संकल्पना विश्वजीतने प्रोजेक्टद्वारे मांडली आहे. या प्रकल्पासाठी कुडाळ हायस्कूलचे शिक्षक योगानंद सामंत, संत राऊळ महाराज कॉलेजचे प्राध्यापक कानशिडे व अटल मेंटॉर रश्मी परब यांचे मार्गदर्शन लाभले. कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेजच्या अटल लॅबचे हे यश कुडाळ हायस्कूलच्या गौरव गाथेत मानाचा तुरा ठरणारे आहे. या यशाबद्दल सर्व संस्था चालक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य आणि विद्यार्थ्यांनी विश्वजीतचे अभिनंदन केले. ज्युनिअर विभागाकडील इतिहासाचे शिक्षक अविनाश परीट यांचा विश्वजीत हा मुलगा असून परीट कुटुंबाचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.