ओवळीयेच्या डॉ. सावंत यांना ''आयकॉन अम्बेसॅडर'' पदक
84246
पुणे ः शिवाजीनगर येथे डॉ. चंद्रकांत सावंत यांना आयकॉन अम्बेसॅडर बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड पदकाने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
ओवळीयेच्या डॉ. सावंत यांना
‘आयकॉन अम्बेसॅडर’ पदक
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १७ ः ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा नाणोस शाळा क्रमांक १ चे पदवीधर शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत आयकॉन अम्बेसॅडर बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड पदकाने सन्मानित करण्यात आले. डॉ. सावंत यांनी गेल्या दोन दशकात समाज हितासाठी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांची या पदकासाठी निवड झाली.
पुणे शिवाजीनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी एमआयटी युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर प्रा. महेश थोरवे, पोलिस मित्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास दादा पठारे, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्तीताई देसाई, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, संस्थेचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश संकुडे आदी उपस्थित होते. डॉ. सावंत यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा ७९ शाळांमधील १३१ विद्यार्थिनी कायमस्वरूपी दत्तक घेत ४ लाख ७ हजार रुपये कायमस्वरूपी देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी त्या-त्या शाळेतील एकूण १३१ मुलींचा कायमस्वरुपी शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. त्यांनी गेली दोन दशके विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा उपक्रमांसाठी स्वतः पदरमोड करून लाखो रुपये खर्च केले आहेत. आर्थिक परिस्थिती अभावी कर्ज फेडू न शकलेल्या फणसवडे गावातील १६ महिलांचे एकूण ५ लाख ३५ हजार ५२५ रुपयाचे कर्ज त्यांनी स्वतः भरून महिलांना कर्जमुक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.