Alphonso Mango
Alphonso Mangoesakal

Hapus Mango Season : यंदाचा आंबा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात; कॅनिंग आंब्याला मिळतोय चांगला भाव

हापूस हंगामात (Konkan Hapus) प्रक्रीया उद्योगासाठी सिंधुदुर्गात कॅनिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
Published on
Summary

कॅनिंगसाठी बागायतदारांच्या बागेत फिरून आंबा गोळा केला जातो. तर काहीवेळा बागायतदार स्वतः व्यावसायिकांकडे आपला आंबा घेऊन येतात.

देवगड : यंदाचा आंबा हंगाम (Alphonso Mango) आता अखेरच्या टप्प्यात आल्याने कॅनिंगच्या माध्यमातून प्रक्रीया उद्योगासाठी आंबा जात आहे. अजूनतरी कॅनिंग आंब्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची अखेरच्या टप्यातील आंबा काढणीची धावपळ सुरू आहे. दरम्यान, तालुक्यात मान्सुनपूर्व पावसाने दिलासा दिल्याने आंबा बागायतदारांच्या दृष्टीने सुखावह बाब मानली जात आहे.

हापूस हंगामात (Konkan Hapus) प्रक्रीया उद्योगासाठी सिंधुदुर्गात कॅनिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. कॅनिंगसाठी बागायतदारांच्या बागेत फिरून आंबा गोळा केला जातो. तर काहीवेळा बागायतदार स्वतः व्यावसायिकांकडे आपला आंबा घेऊन येतात. यंदा हापूसची मोठी उलाढाल झाली. तुलनेत फळबाजारातील दर कमी-अधिक राहिले. मात्र, खासगी बाजारात दर चांगला मिळाला. काही बागायतदारांकडील आंबा आता अखेरच्या टप्यात आला आहे. त्यातच कॅनिंग व्यवसाय सुरू झाला आहे.

Alphonso Mango
Milk Collection : दूध संकलनात तब्बल सव्वातीन लाख लिटरची घट; शेतकऱ्यांना प्रतिदिन 1.25 कोटींचा फटका

मुबलक आंबा झाला आणि फळबाजारातील दर घसरले की आपोआपच प्रक्रीया उद्योगाकडे आंबा वळतो असे सर्वसाधारण चित्र असते. आता फळबाजारात आंबा जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्रतवारी करून उरलेला तसेच डागी आंबा कॅनिंगला दिला जातो. कॅनिंग व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होण्यासही मदत होते. आता आंबा हंगाम अखेरच्या टप्यात आल्याने कॅनिंग व्यवसायात तेजी आहे. सध्या सुमारे ४० ते ४५ रूपये किलोप्रमाणे दर दिला जात आहे.

Alphonso Mango
Guhagar Beach : बोऱ्‍या समुद्रकिनारी तांडेलच्या डुलकीमुळे बोट अडकली थेट खडकावर; सात प्रवासी सुखरूप

त्यामुळे मोठे बागायतदार प्रतवारी करून शिल्लक राहिलेला आंबा कॅनिंगसाठी देत आहेत. अखेरच्या टप्यात हंगाम आल्याने आता आंबा काढणी मंदावली आहे. अजून काही बागांमध्ये झाडांवर आंबा आहे. मात्र, आंबा तयार होण्यासाठी काही कालावधी जाईल, असे चित्र आहे. त्यामुळे अखेरच्या टप्यातील आंबा बाजारात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात येईल, अशी शक्यता आहे. त्यावेळी बाजारातील दरानुसार कॅनिंग व्यवसायाची स्थिती लक्षात येईल.

यंदा आंबा उत्पादन चांगले झाले असले तरी फळबाजारात अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे मुंबई वगळता अन्य बाजारात हापूस विक्रीसाठी पाठवला गेला. खासगी स्वरूपातील विक्रीला तुलनेत चांगला भाव होता. फळबाजारात दर पडले तरी कॅनिंग आंब्याला चांगला भाव मिळत आहे. मान्सूनपूर्व पाऊस न झाल्यास बागायतदारांना त्याचा लाभ होईल.

-प्रशांत शिंदे, आंबा बागायतदार, कातवण (देवगड)

Alphonso Mango
Konkan Tourism : हिरवेगार जंगल अन् निळाशार धबधबा..; हा निसर्गसोहळा अनुभवायचाय असेल, तर 'या' गावाला जरुर भेट द्या..

हंगाम आता अखेरच्या टप्यात आला आहे. काही शेतकऱ्यांच्या आंबा हंगामाचे सूप वाजले आहे. फळबाजारात आंब्याला दर कमी मिळाला तरी कॅनिंग आंब्याचा दर चांगला राहिला. साधारणपणे ४० ते ४५ रुपयेपर्यंत कॅनिंगचा दर मिळाला. त्यामुळे अखेरच्या टप्यातील बऱ्यापैकी आंबा कॅनिंगकडे वळला. आता मान्सूनपूर्व पाऊस झाल्यास कॅनिंगचे दर गडगडतील.

-रूपेश पारकर, आंबा बागायतदार, वरेरी (देवगड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.