साळशीतील वृद्धाची
गळफासाने आत्महत्या

साळशीतील वृद्धाची गळफासाने आत्महत्या

Published on

साळशीतील वृद्धाची
गळफासाने आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः साळशी-कुळ्याचीवाडी (ता. देवगड) येथील वृद्ध घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. शशिकांत नारायण साटम (वय ८५) असे त्याचे नाव आहे. त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना मंगळवारी (ता. २१) सायंकाळी घडली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळशी-कुळ्याचीवाडी येथील शशिकांत साटम आणि त्यांची पत्नी असे दोघे जण घरी असतात, पत्नी आजारी असते. घरात शशिकांत साटम गळफास लावलेल्या स्थितीत आढळले. त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.