आपत्ती व्यवस्थापनाची मालवणात रंगीत तालीम

आपत्ती व्यवस्थापनाची मालवणात रंगीत तालीम

Published on

swt311.jpg
87518
मालवणः आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची रंगीत तालीम झाली.

आपत्ती व्यवस्थापनाची
मालवणात रंगीत तालीम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : येथील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सक्षमता व तयारी यांच्या चाचणीसाठी तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम नुकतीच रॉकगार्डन परिसरात घेण्यात आली. एका दुकानाच्या ठिकाणी सिलेंडर स्फोट होऊन आग लागली. त्यावेळी काही लोक अडकले. याबाबत माहिती मिळताच बचाव कार्यासाठी विविध यंत्रणा दाखल होत तत्पर बचावकार्य कशाप्रकारे करतात, याची रंगीत तालीम घेण्यात आली. कोणत्याही आपत्ती काळात बचाव कार्यासाठी यंत्रणा तत्पर असल्याचे दिसून आले. यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, महसूल नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांसह पोलिस, आरोग्य व तालुक्यातील विविध खात्याचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.