मालवण संगीत विद्यालयातर्फे
ओझरमधील मठात स्वच्छता

मालवण संगीत विद्यालयातर्फे ओझरमधील मठात स्वच्छता

Published on

मालवण संगीत विद्यालयातर्फे
ओझरमधील मठात स्वच्छता

मालवण, ता. ३ ः येथील आदर्श संगीत विद्यालयाची वनभोजन सहल ओझर येथील श्री ब्रह्मानंद स्वामी मठाच्या निसर्गरम्य ठिकाणी झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आनंद लुटतानाच स्वच्छता मोहीम राबवित मठाचा परिसर स्वच्छ केला. तसेच यावेळी विद्यालयाच्या वतीने मठाच्या परिसरात सदा चुरी यांच्या हस्ते कदंब वृक्षाच्या रोप लावण्यात आले. संगीत अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना निसर्गाशी देखील एकरूप होऊन आनंद लुटता यावा, या दृष्टीने या सहलीचे आयोजन केले होते. विद्यालयाचे तबलावादन शिक्षक सुधीर गोसावी यांच्या नियोजनाखाली ही सहल झाली. यासाठी पालकांचेही सहकार्य लाभले. यावेळी सुधीर गोसावी यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक मंगेश कदम, विजय बोवलेकर आदी उपस्थित होते.
94346

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.