उभे कटिंग दरडी कोसळण्यास कारणीभूत

उभे कटिंग दरडी कोसळण्यास कारणीभूत

Published on

-Rat८p२७.jpg, rat८p२८.jpg ः
२४M९५५९८, २४M९५५९९
माहू : महामार्गाच्या कामासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी माहू तुळशीघाटात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या खोदाईने दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
------------------
उभे कटिंग दरडी कोसळण्यास कारणीभूत

माहू-तुळशी घाट; राष्ट्रीय महमार्गासाठी खोदकाम; डोंगरांचा पाया ठिसूळ

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ८ ः माहू ते तुळशीघाटात वारंवार कोसळणाऱ्या दरडीमुळे भविष्यकालीन धोका वाढल्याचे स्पष्ट होत आहे. मान्सून सुरू झाल्यापासून तुळशीघाटात दररोज कोसळणाऱ्या दरडी साफ करण्यासाठी प्रशासनास ताकद व वेळ खर्च करावा लागत आहे. नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास न करता राष्ट्रीय महमार्गासाठी करण्यात आलेली उभी कटिंग ही या सर्वाला कारणीभूत ठरत आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रूंदीकरणाचे कामासाठी बाराव्या शतकापासूनचे ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या मंडणगड किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी अनेक ठिकाणी उत्खनन करण्यात आले. तुळशीघाटातील जुना रस्ता किल्ल्याच्या पायथ्याने डोंगराला किमान १५ वळसे घालून पूर्ण होतो. यंदा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या प्रयोजनार्थ अनेक ठिकाणी वाकणे रूंद करण्यासाठी याचबरोबर रस्ता खोदण्यासाठी डोंगराच्या बाजूने उभी खोदाई करण्यात आली आहे. किल्ल्याच्या ऐतिहासिक संदर्भामुळे यापूर्वी या डोंगरपरिसरात काळ्या दगडाच्या खोदाई करण्यासाठीही अनेक परवानग्या घ्यावा लागत असत. याचबरोबर यापूर्वी ४० वर्षे आधी तयार झालेला रस्ता येथील पर्यावरणाचा समतोल ढासळणार नाही, या बेताने तयार करण्यात आला असल्याने दरड कोसळण्याच्या घटना अभावानेच घडत असत. यंदा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात येत असताना जास्तीचे जमीन अधिग्रहण करावे लागू नये यासाठी प्राधिकरण व ठेकेदाराने रस्त्याचे जुन्या हद्दीतच उभे कटिंग केले. हे कटिंग तिरके असणे गरजेचे होते; मात्र संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याने डोंगराकडील बाजूने दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरडी कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. ती थांबू नये यासाठी रस्त्यावर आलेली दरड साफ करण्यासाठी प्रशासनास वेळ ताकद व मनुष्यबळ खर्च करावे लागते. डोंगराकडील आणि खोल दरीकडील बाजूने संरक्षक भिंती व अन्य उपाययोजना करण्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी तालुकावासियांमधून केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.