Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणारच; कोकणात शिवसैनीकांनी सोडला संकल्प
Kankavali News : सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निवडून यावेत, यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. तसेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हाच पारकर यांच्या वाढदिनाचा संकल्प सर्वांनी करूया, असे आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले.
येथील भगवती मंगल कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना जिल्हा महिला संघटक नीलम पालव आदी उपस्थित होते.
माजी खासदार श्री.राऊत म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत सव्वाशे कोटींचे वाटप करून माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला साडेचार लाख मते मिळाली. तर मी एक रूपया देखील खर्च न करता मला चार लाख मतदारांनी पसंती दिली. मतदारांच्या प्रामाणिकपणाला आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना कदापि विसरणार नाही.’’ यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव यांनी श्री.पारकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख संजय पडते, मंदार शिरसाट, राष्ट्रवादीचे बाळ कनयाळकर, प्रा. दिवाकर मुरकर, अवधूत मालणकर, संदीप कदम, माधवी दळवी, वैदेही गुडेकर, सरपंच बंडू ठाकूर, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, शिवसेना तालुका प्रमुख कन्हैया पारकर, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, किरण टेंभुलकर, रुपेश नार्वेकर, प्रसाद अंधारी,आदित्य सापळे, संतोष पुजारे, तेजस राणे, गुरू पेडणेकर, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. नीलेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.
---
भविष्यातील सत्तेत सिंधुदुर्गाचा वाटा हवा
वैभव नाईक म्हणाले, ‘‘गेली ३१ वर्षे एका नेत्याचा सातत्याने भव्य दिव्य वाढदिवस साजरा होणे यातच संदेश पारकर यांचे यश सामावले आहे. दरम्यान, लोकसभेतील गाफिलपणा आता विधानसभेत परवडणारा नाही. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्यासाठी सत्तेत सिंधुदुर्गाचा वाटा असायला हवा हे लक्षात घेऊन काम करा.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.