डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये ४ ऑगस्टला पंच परीक्षा

डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये ४ ऑगस्टला पंच परीक्षा

Published on

‘डॉन बॉस्को’मध्ये
होणार पंच परीक्षा
सिंधुदुर्गनगरीः सिंधुदुर्ग जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन व जिल्हा क्रीडा विभाग यांच्यावतीने अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकाराचे वर्कशॉप आणि पंच परीक्षा ४ ऑगस्टला येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये आयोजित केली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या अध्यक्षा कल्पना तेंडुलकर यांनी दिली. ४ ऑगस्टला आयोजित केलेले अ‍ॅथलेटिक्स वर्कशॉप व पंच परीक्षा सकाळी ८.३० ते दुपारी १ या वेळेत होणार असून पंचांना आयोजकांकडून उत्तीर्ण प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पंच परीक्षा ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची असेल. प्रॅक्टिकल परीक्षा शालेय स्पर्धा व अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनकडून होणाऱ्या स्पर्धामध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेनंतर अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनकडून होणाऱ्या जिल्हा, राज्य ई-पंच परीक्षा देता येणार आहे. जिल्ह्याच्या टीमबरोबर मॅनेजर म्हणून राज्य स्पर्धांना जाण्याची संधी मिळणार आहे. या वर्कशॉपमध्ये पुणे येथून महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय पंच किशोर शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन कल्पना तेंडुलकर यांनी केले आहे.
-----------------------
असलदे गावासाठी
लोखंडी बाक प्राप्त
नांदगावः असलदे ग्रामपंचायतमध्ये कणकवली विधानसभा मतदाराचे आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे लोखंडी बाकडी प्राप्त झाली होती. या लोखंडी बाकड्यांचे वाडीनिहाय गावात वाटपाचा प्रारंभ सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोखंडी बाकडी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आमदार नितेश राणे यांचे गावातील ग्रामस्थांनी ऋण व्यक्त केले. पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे, चेअरमन भगवान लोके, सचिन परब, पंढरी वायंगणकर, दयानंद हडकर, सुवर्णा दळवी, विद्या आचरेकर, विजया डामरे, देवेंद्र लोके, वासुदेव दळवी, महेश लोके, प्रवीण डगरे, बाबाजी शिंदे, रघुनाथ लोके, सुरेश मेस्त्री, विजय खरात, शत्रुघ्न डामरे, ग्रामसेवक संजय तांबे, मधुसूदन परब, सत्यवान घाडी, प्रकाश वाळके आदी उपस्थित होते.
-----------------------
दोडामार्ग येथे उद्या
गुरुपौर्णिमा उत्सव
दोडामार्गः स्वर, ताल, संगीत विद्यालय दोडामार्ग व श्री राष्ट्रोळी कला, क्रीडा ग्रामविकास मंडळ घाटवाडी, कसई दोडामार्ग यांच्यावतीने महालक्ष्मी सभागृहात रविवारी (ता.२८) दुपारी २ ते ५ वाजता गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध उपक्रम होणार असून या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक व संगीतप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक प्रेमप्रकाश नाईक यांनी केले आहे. विद्यार्थ्यांचे गायन, वादन, नृत्य तसेच शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक परीक्षा २०२३-२४ मध्ये तालुक्यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणार आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. पूर्व उच्च माध्यमिक परीक्षेत यशस्वी अनय घाडी, सायली नाईक, श्लोक सावंत व सुरभी पाटील तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जयसिंग खानोलकर, चिन्मय सावंत व गिरिजा धुरी यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रेमप्रकाश नाईक यांनी दिली आहे.
--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com