राजापूर-सागरी महामार्गावरील दांडे पूल हलक्या वाहनांसाठी सुरू

राजापूर-सागरी महामार्गावरील दांडे पूल हलक्या वाहनांसाठी सुरू

Published on

00757

दांडे पूल हलक्या वाहनांसाठी सुरू
अवजड वाहतूक बंदच; जोडरस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अपूर्ण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता.२९ः सागरी महामार्गावरील तालुक्यातील दांडे येथील पुलाचे काम दीड वर्ष सुरू आहे. सद्यःस्थितीमध्ये हा पूल हलक्या वाहनांसाठी खुला झाला असला तरी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी गणेशोत्सवापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा आणि तालुक्याच्या पश्‍चिम भागातील लोकांना वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार्‍या दांडे पुलाची सुमारे दहा वर्षापूर्वी उभारणी झाली होती. त्यानंतर या पुलाचा पिलर एका बाजूने खचल्याने वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. भविष्यामध्ये पुलाच्या बांधकामाला कोणताही धोका पोहचू नये, या उद्देशाने या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतरही काही वर्ष पुलावरून अनधिकृतपणे वाहतूक सुरू होती. त्यानंतर दीड वर्षापूर्वी पुलाचे बांधकाम हाती घेतले होते. अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले असून, दुरुस्ती केलेला पुलाचा भाग आणि जोडरस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अपूर्ण आहे. हे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. वाहनचालकांसह प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन सद्यःस्थितीमध्ये पुलावरून हलक्या वाहनांना रहदारीसाठी मुभा देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.