कोकण
वृद्ध दीनाआबा-पार्वती यांची भावनिक उपासमार
कोकणात ओणी इथे राहणाऱ्या शेट्ये आजी आणि आजोबा ही अशीच अचानक माझ्या नोकरीच्या अगदी आरंभी संपर्कात आलेली दोन माणसे.
कोकणात ओणी इथे राहणाऱ्या शेट्ये आजी आणि आजोबा ही अशीच अचानक माझ्या नोकरीच्या अगदी आरंभी संपर्कात आलेली दोन माणसे. मी राजापूर तालुक्यात पाचल ब्रॅंचला १९८१ ला नोकरीची सुरवात केली तेव्हा मी २१ वर्षांचा होतो. जग फारसे पाहिले नव्हते आणि आजच्यासारखी लोकांकडे पाहण्याची त्रयस्थ दृष्टीदेखील नव्हती.
त्या काळी मुंबई-गोवा रस्ता अगदी एकेरी होता, इतका की समोरून सायकल आली तरी गाडी हळू करून जावे लागे. शनिवार-रविवार सुट्टी झाली की, मी रविवारी रात्री एकनंतर मुंबईहून तळकोकणात जाणारी एखादी गाडी घेऊन ओणी इथे जात असे आणि तिथून मग राजापूरकडून येणारी पाचलकडे जाणारी बस बदलून जात असे.