गोखले विद्यालयात मुलींसाठी स्वसंरक्षण वर्ग
-rat४p३६.jpg-
२४N०९२६७
राजापूर ः गोखले विद्यालयात आयोजित स्वसंरक्षण वर्गात कराटेचे प्रात्यक्षिक दाखवताना विद्यार्थिनी.
----------
गोखले विद्यालयात स्वसंरक्षण वर्ग
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ४ ः राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथील गोखले विद्यालयात मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.
प्रशालेतील सखी सावित्री विभागाच्या सदस्या सोनाली नार्वेकर यांनी राजापूर तायक्वांदो प्रशिक्षण यांच्यातर्फे हा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. त्यामध्ये तायक्वांदो प्रशिक्षण टीमने मुलींना स्वतःचे संरक्षण कसे करावे? आपण कसे वागावे, आपल्यावर संकट आल्यास आपण कसे सक्षम असले पाहिजे, आपला बचाव कसा करावा आणि त्यासाठी मुलींना कराटे येणे कसे अत्यावश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. कराटेतील हात व पाय यांच्या काही स्टेप्स दाखविल्या व मुलींकडून करून घेतल्या. या वर्गासाठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गोरे यांनी सर्व मुलांसह प्रशिक्षणाचा लाभ घेतला. गोखले हायस्कूलच्या मुख्याध्यापिका हरचकर यांनी मुली किंवा मुले यांनी संकटकाळी स्वसंरक्षण कसे करावे यासाठी उत्तम उपक्रम राबवल्याबद्दल कौतुक केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.