विकासात युवकांचे योगदान महत्त्वाचे

विकासात युवकांचे योगदान महत्त्वाचे

Published on

15055

विकासात युवकांचे योगदान महत्त्वाचे

राजेंद्र मगदूम ः कुडाळ पोलिसांतर्फे ‘माहिती अधिकार दिन’

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३० ः गावाच्या विकासासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा.‌ आजच्या तंत्रज्ञान युगात पुढे जाण्यासाठी डिजिटल यंत्रणेचाही वापर करणे गरजेचे आहे. गावाच्या हितासाठी युवकांनी माहितीचा अधिकार आणि सोशल मीडियाचा सजगपणे वापर करावा, असे आवाहन कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले.‌
शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहार होऊ नये तसेच शासकीय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब, सहजगत्या व्हावीत, यासाठी ‘माहितीचा अधिकार’ या कायद्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र शासनाच्यावतीने २८ सप्टेंबरला माहिती अधिकार दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. २८) कुडाळ पोलिसांनी माहितीच्या अधिकाराबाबत नारुर गावातील ग्रामस्थांना मार्गदर्शन करून माहिती अधिकारी दिन साजरा केला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर, पोलिस कॉन्स्टेबल ज्योती शिरोडकर, नारुरचे उपसरपंच मुकुंद सरनोबत, जगदीश सरनोबत, ग्रामपंचायत सदस्य सानिका सरनोबत, ग्रामपंचायत सदस्य शेजल चव्हाण, शिवाजी राऊळ, मधुकर तेरसे, अमित सरनोबत, महादेव लुडबे, किशोर सरनोबत, प्रताप राणे, भगवान जाधव, संजय आचरेकर, संतोष तांबे, सागर परब, एकनाथ सरनोबत, चंद्रकांत मेस्त्री, श्री. बिले, सौ. कदम, सावित्री सरनोबत, दिगंबर माने आदी उपस्थित होते.
यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर आणि पोलिस हवालदार ज्योती शिरोडकर यांनी नारुर ग्रामस्थांना माहितीचा अधिकार कायदा व त्याचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध दाखले देऊन मार्गदर्शन केले. नारुर गावात अशा प्रकारचे कार्यक्रम राबविल्यास कुडाळ पोलिसांच्यावतीने ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येईल. समाजोपयोगी उपक्रमांना सहकार्य राहील, असे आश्वासन पोलिस निरीक्षक मगदूम यांनी दिले.
---------
ग्रामस्थांचे केले प्रबोधन
पोलिस निरीक्षक मगदूम यांनी नारुरवासीयांना सोशल मीडिया व माहितीचा अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. समाजाच्या हितासाठी सोशल मीडियाचा कशाप्रकारे वापर करावा, याबाबत सविस्तर माहिती दिली. शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहार होऊ नये, यासाठी कशा पद्धतीने काम करावे, याबाबत मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.