कणकवलीत शुक्रवारी 
दिव्यांगांसाठी शिबिर

कणकवलीत शुक्रवारी दिव्यांगांसाठी शिबिर

Published on

कणकवलीत शुक्रवारी
दिव्यांगांसाठी शिबिर
कणकवली ः दिव्यांग व्यक्तींना ‘एडीआयपी’ योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी, त्यांच्या तपासणीसाठी तज्ज्ञांची टिम ४ ऑक्टोबरला कणकवलीत येत आहे. हे तपासणी शिबिर सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या सभागृहात आयोजित केले आहे. दिव्यांग बांधवांनी शिबिरासाठी येताना अपंगत्व दर्शविणारे छायाचित्र, किमान ४० टक्के अपंगत्व असलेले दिव्यांग प्रमाणपत्र किंवा यूडीआयडी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी संकेतस्थळावर अर्ज दाखल केल्यास त्याची ऑनलाईन पावती, २२,५०० रुपयांपेक्षा जास्त मासिक उत्पन्न नसल्याचा दाखला, आधारकार्ड आदी कागदपत्रे घेऊन शिबिरस्थळी उपस्थित राहावे. दिव्यांगांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले आहे. सरपंच, ग्रामसेवकांनी आपापल्या गावांतील दिव्यांग गरजू बांधवांना शिबिराची कल्पना द्यावी, असे पत्रही त्यांना दिल्याची माहिती चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
-------------
रिक्षाचालकांसाठी
ऑनलाईन फॉर्म
ओरोस ः रिक्षाचालक-मालक यांना कल्याणकारी मंडळाचा फॉर्म भरणे सुलभ व्हावे, यासाठी आर.टी.ओ. कार्यालयात ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटनेमाफत उपलब्ध करून दिली आहे. कल्याणकारी मंडळाचे लाभ घेण्यासाठी रिक्षाचालक, मालकांनी आर.टी.ओ. कार्यालयाकडून ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. हे फॉर्म भरताना अनेकांना अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटनेने सिंधुदुर्गनगरी येथील आर.टी.ओ. कार्यालयाच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला असलेल्या चौकशी कक्षात हे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ज्यांना स्वतःहून ऑनलाईन फॉर्म भरणे शक्य होणार नाही, त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन रिक्षा संघटना अध्यक्ष संजय शारबिद्रे यांनी केले आहे.
--------------
मालवण-भरड येथे
कीर्तन पंचक सोहळा
मालवण ः भरड येथील श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सलग तेराव्या वर्षी कीर्तन पंचकाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत १२ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत रोज रात्री ९ वाजता श्री दत्त मंदिरात कीर्तन सेवा सादर होणार आहे. यात १२ ला वर्षा रानडे-सहस्त्रबुद्धे यांचे ‘गोपेश्वर’ विषयावर, १३ ला लक्ष्मीप्रसाद पटवारी-कुलकर्णी यांचे ‘विवेकानंद’, १४ ला प्रज्ञा देशपांडे-पळसोदकर यांचे ‘माणकोजी बोधले’, १५ ला मोहक रायकर यांचे ‘सीता स्वयंवर’, १६ ला विश्वास कुलकर्णी यांचे ‘संत तुलसीदास’ विषयावर कीर्तन होणार आहे. कीर्तन रसिकांनी या पंचक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
आशियेत वृद्धांची
नेत्र चिकित्सा
कणकवली ः आशिये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील गरजू वयोवृद्ध नागरिकांची कणकवलीतील लायन्स आय हॉस्पिटल येथे नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी ५२ जणांना चष्माव़ाटप करण्यात आले. आवश्यकता असलेल्या नागरिकांची लायन्स आय हॉस्पिटल येथे मोतिबिंदू शस्त्रक्रियाही पार पडली. आशिये सरपंच महेश गुरव यांची सामाजिक बांधिलकी स्तुत्य असल्याचे कौतुकोद्गार लायन्स आय हॉस्पिटलच्या डॉ. गीता दळवी यांनी काढले. महेश गुरव, उपसरपंच संदीप जाधव, ग्रामसेवक राकेश गोळवणकर, लायन्स आय हॉस्पिटलचे डॉ. सिद्धार्थ कदम, डॉ. तेंडुलकर, मनाली सावंत, दादा कोरडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.