विशाल परबांच्या वाढदिनानिमित्त बांदा आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका

विशाल परबांच्या वाढदिनानिमित्त बांदा आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका

Published on

19118


विशाल परब यांच्या वाढदिनानिमित्त
बांदा आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ः भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. विशाल परब यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत, माजी सभापती शीतल राऊळ, अॅड. अनिल निरवडेकर, माजी सरपंच अक्रम खान, बाळा आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, शामसुंदर मांजरेकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, सिद्धेश पावसकर, राकेश केसरकर, केदार कणबर्गी, नीलेश कदम, सिद्धेश महाजन, गुरू कल्याणकर, समीर कल्याणकर, अक्षय परब, उदय येडवे, अक्षय मयेकर, नीलेश देसाई, सुनील राऊळ, शैलेश केसरकर, श्रेया केसरकर, तनुजा वराडकर, रेश्मा सावंत, देवल येडवे, दीपलक्ष्मी सावंत-पटेकर उपस्थित होते.
उद्योजक रतन टाटा यांचे निधन झाल्याने परब यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. बांद्यात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.