कणकवली : नवदुर्गा उपक्रम

कणकवली : नवदुर्गा उपक्रम

Published on

19590

कलमठ ग्रामपंचायतीच्यावतीने नवदुर्गांचा सत्‍कार
कणकवली, ता. १७ : विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा कलमठ ग्रामपंचायतीच्यावतीने सत्‍कार करण्यात आला. सरपंच संदीप मेस्त्री यांच्या संकल्‍पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
सत्‍कार मूर्तींमध्ये वरवडे प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली वळंजू, कलमठच्या तलाठी सुवर्णा कडूलकर, कलमठ बाजारपेठ शाळेच्या मुख्याध्यापक मधुरा सावंत, पोस्ट वुमन गार्गी शिवलकर, धर्नुविद्या क्षेत्रात राष्‍ट्रीय पातळीवर कामगिरी बजावणाऱ्या आक्‍सा शिरगावकर, संगणक परिचालिका ज्‍योती आमडोसकर, होमगार्ड वर्षा रोडये, तसेच सामाजिक कार्यकर्त्या शैलजा मुखरे आणि अंकिता राणे यांचा समावेश होता.
आमचा सत्‍कार म्‍हणजे आमच्या कामाचा सन्मान आहे असे प्रतिपादन डॉ. रूपाली वळंजू यांनी यावेळी केले. तर मुख्यमंत्री माझी शाळा योजनेत आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक आणण्यात ग्रामपंचायतीचेही मोठे योगदान असल्‍याचे मुख्याध्यापक मधुरा सावंत म्‍हणाल्या. तर कलमठ गावच्या विकासात सर्व नवदुर्गांचे महत्‍वाचे योगदान असल्‍याचे प्रतिपादन सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले.
या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र यादव, नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, स्वाती नारकर, नजराना शेख, प्रियाली आचरेकर, ग्राम पंचायत कर्मचारी महेंद्र कदम, कुशाल कोरगांवकर, गणेश सावंत, अण्णा सावंत, चव्हाण, जयेश मेस्त्री, समर्थ कोरगांवकर, सचिन वाघेश्री उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.