जखमी वासरावर प्राणीप्रेमींकडून उपचार

जखमी वासरावर प्राणीप्रेमींकडून उपचार

Published on

जखमी वासरावर प्राणीप्रेमींकडून उपचार

संगमेश्वरमधील प्रकार; मोकाट गुरांच्या मालकावर कारवाई करा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १७ ः गटारामध्ये पडून जखमी झालेल्या वासरावर संगमेश्वरमधील प्राणीप्रेमींनी उपचार करत त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली आहे. अनेक शेतकरी गुरांना मोकाट सोडून देत असून त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे.
संगमेश्वर येथील मुळ्ये स्टॉप परिसरात एक लहान वासरू गटारात जखमी अवस्थेत पडलेले होते. त्या वासराकडे प्राणीप्रेमी गुरूनाथ खातू यांचे लक्ष गेले. त्यांनी वासराला सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी आणून ठेवले. पशुवैद्यकीय डॉ. ढाकणे आणि डॉ. सूरज जगताप यांना बोलावण्यात आले. त्यांनी वासराच्या पायाची जखम पूर्ण स्वच्छ करून मलमपट्टी केली. दीपक वेल्हाळ आणि संतोष जाधव यांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे उपचार चांगल्याप्रकारे करता आले. वेल्हाळ यांनी देखभालीची जबाबदारी घेतली. उपचार चालू असताना गाय तिथेच होती. एकीकडे प्राणीप्रेमी जबाबदारीने काम करत असताना मालकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. काही मालकांना आपल्या गुरांची दुखापत झाली आहे, हे माहितीही नसते. अशा मोकाट गुरांचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांच्या मालकीची गुरे आहेत त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी संगमेश्वरवासियांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.