थ्रो स्पर्धेत धनावडे प्रथम

थ्रो स्पर्धेत धनावडे प्रथम

Published on

हॅमर थ्रो स्पर्धेत
धनावडे प्रथम

चिपळूण ः डेरवण येथील क्रीडा संकुलात झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात सती चिंचघरी येथील न्यु इंग्लिश स्कूलच्या आदित्य धनावडे याने हॅमर थ्रो क्रीडाप्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल मुख्याध्यापक संजय वरेकर, उपमुख्याध्यापक विश्वास दाभोळकर, पर्यवेक्षक पांडुरंग पाटील, आसावरी राजेशिर्के, आमदार शिखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, संचालक शांताराम खानविलकर, सेक्रेटरी महेश महाडिक आदींसह पालक, विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
---
प्रेरणा, श्रावणी
भोंडला स्पर्धेत प्रथम

गुहागर ः तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी विभागातर्फे भोंडला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. राधिका कदम यांनी काम पाहिले. निसर्गातील पानाफुलांच्या साह्याने विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक भोंडले साकारले. आधुनिकतेचा आग्रह धरताना परंपरा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, विद्यार्थ्यांच्या अंगी अवगत असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने नवरात्रोत्सवानिमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रेरणा शिंदे व श्रावणी मेस्त्री या ग्रुपने पटकावला. द्वितीय क्रमांक इशा हेगशेट्ये आणि अक्षता कदम यांनी तर तृतीय क्रमांक गौरव तेरेकर व मानस विचारे या ग्रुपने मिळवला.
---
बेहेरे महाविद्यालयात
जीवनकौशल्यावर मार्गदर्शन

दापोली ः तालुक्यातील वाकवली येथील डॉ. वि. रा. घोले माध्यमिक विद्यालय व पद्मश्री अण्णासाहेब बेहेरे कनिष्ठ महाविद्यालयात जीवन कौशल्यावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील आय. ए. पी. ए. या संस्थेच्या कार्यकर्त्या असलेल्या अश्विनी वैद्य यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना जीवनकौशल्ये विषयक कृतीयुक्त मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य अरूण सिदनाईक यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्‍घाटन झाले. या वेळी अश्विनी वैद्य यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना भेडसावणारे ताणतणाव, चिंता, गैरसमज, अहंगंड, न्यूनगंड, नकारात्मकता, नैराश्य, व्यसनाधीनता, आत्मविश्वासाचा अभाव, पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे, पालकांचे अज्ञान, आवश्यक आहार, वर्तन, आरोग्य आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.