Chiplun Assembly Elections 2024
Chiplun Assembly Elections 2024

Chiplun Assembly Elections : चिपळुणात राष्ट्रवादीचे दोन्ही गट भिडणार

NCP candidates in Chiplun : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, मनसे, कुणबी सेना आदी पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
Published on

सावर्डे : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, मनसे, कुणबी सेना आदी पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने येणार आहेत.

चिपळूण व संगमेश्वर तालुक्यात विभागलेल्या चिपळूण विधानसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटप झालेले नाही; मात्र या ठिकाणी जवळजवळ उमेदवार निश्चित झालेले आहेत. सध्या हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ताब्यात आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत दोनवेळा आमदार असलेल्या शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम हे विजयी झाले.

Chiplun Assembly Elections 2024
विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टी ३५ जागा लढविणार

मागील पाच वर्षात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यामुळे शिवसेनेत शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) असे दोन गट पडले. त्यामुळे साहजिकच मतदार संघातील माजी आमदार सदानंद चव्हाण हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले तर माजी आमदार रवींद्र माने, सुभाष बने, माजी जिल्हा शिवसेनाप्रमुख राजेंद्र महाडिक, संतोष थेराडे यांच्यासारखे खंदे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहिले.

मतदार संघातील विद्यमान आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणे पसंत केले. माजी आमदार रमेश कदम, बारक्याशेठ बने हे शरद पवार यांची साथ न सोडता राष्ट्रवादी शरद पवार गटात राहिले. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राहिलेले प्रशांत यादव यांनी विधानसभेच्या जागेवर डोळा ठेवून तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश मिळवला.

Chiplun Assembly Elections 2024
Vidhan Sabha election 2024: महायुतीने ठाकरेंना डिवचले; जाहिरातीतून उडवली खिल्ली

मागील महिन्यात आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिपळुणात आणून भव्य सभा घेऊन आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले तर लगेच दोन दिवसांनी प्रशांत यादव यांनी शरद पवार यांची जंगी सभा घेऊन या मतदार संघातून लढण्याचे संकेत दिले आहेत. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेखर निकम हे निश्चित मानले जात आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.