मिरकरवाडा जेटीवर शुकशुकाट
मिरकरवाडा जेटीवर शुकशुकाट
मच्छीमारांची सुटी ः शिरगाव, परटवणे, राजिवड्यात सकाळीच गर्दी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः शहरात तसेच नजीकच्या परिसरात लोकशाही महोत्सवात मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. शिरगाव, परटवणे, मिरकरवाडा, घुडेवठार, राजिवडा येथे सकाळच्या सत्रात अनेकांनी मतदाना हक्क बजावला. विविध पक्षांच्या बूथवर न जाता नागरिकांनी थेट स्लिप घेऊन मतदान केंद्राचा आधार घेतला. मिरकरवाडा येथील बंदरावर शुकशुकाट होता.
शिरगाव, परटवणे, मिरकरवाडा, घुडेवठार येथे सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात मतदान झाले. ठिकठिकाणी मतदान केंद्राच्या रस्त्यावर विविध पक्षांचे बूथ तयार करण्यात आले होते. घुडेवठार येथे चक्क महिलांनी बूथचा ताबा घेतला होता. अनेक महिलांनी या बूथवर सकाळपासून हजेरी लावली होती. चांगल्या प्रकारे वृद्धांना माहिती देऊन मतदान होत असल्याचे निदर्शनास आले तर शिरगाव परिसरात पक्षांच्या बूथवर कोणतीही गर्दी नव्हती. शिरगाव-शिवरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाळेतील मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात गर्दी होती तर मिरकरवाडा येथील मतदान केंद्रावर मुस्लिम बंधू-भगिनींनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती. मिरकरवाडा, राजिवडा या मतदान केंद्र येथे पोलिस बंदोबस्त कडक होता. या कोणत्याही मतदान केंद्रावर दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार समोर आलेला नाही. नागरिकांनी दैनंदिन कामाचा उरक करण्यासाठी सकाळीच मतदानाला रांगा लावल्या होता. अकरा ते बारा या वेळेत मतदानावर कमी प्रमाण दिसले. मिरकरवाडा जेटी परिसरात परप्रांतीय खलाशी निवांत होते. शाळांना सुट्टी असल्यामुळे मिरकरवाडा जेटी येथे शुकशुकाट पाहायला मिळाला तसेच मांडवी या ठिकाणी मुलांनी व्हॉलिबॉल तर पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.