जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बोगस फेसबुक खाते

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बोगस फेसबुक खाते

Published on

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे
सोशल मीडियावर बनावट खाते

अनेकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट; कोणतीही माहिती न देण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचे सोशल मीडियावरील आकाउंट हॅक करण्यात आले आहे. त्यांच्या आकाउंटवरून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून कोणतीही मागणी केली जात आहे. तरी हे बनावट खाते असून यावर कोणतीही माहिती देऊ नका, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.
देवेंदर सिंह, आयएएस रत्नागिरी कलेक्टर किंवा देवेंदर सिंह अशा नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली जात आहे. त्या द्वारे बँकखाते नंबर व मोबाईल नंबर मागवला जातो किंवा जुने फर्निचर, साहित्य विक्रीची माहिती देऊन ते खरेदीसाठी प्रवृत्त केले जात आहे. अशाप्रकारे आतापर्यंत अनेकवेळा वेगवेगळ्या नावाने बनावट खाते तयार करून फ्रेण्ड रिक्वेस्ट केली जात आहे. याबाबत वेळोवळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सायबर पोलिस ठाण्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. या संदर्भात नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ प्राप्त झाल्यास फोन करून एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी रत्नागिरी अशा नावाने मोबाईल नंबर, आधारकार्ड नंबर आणि बँक अकाउंट नंबर विचारल्यास किंवा अन्य वस्तू खरेदी-विक्रीसाठी विचारणा केल्यास कोणतीही माहिती देण्यात येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.