Raigad Fort
Raigad Fortsakal

Raigad Fort : किल्‍ले रायगडावरील सुरक्षा व्यवस्‍था अडचणीत; गडावरील पायरी मार्ग बंद

पावसाळ्यात रायगड किल्ल्यावर वारंवार दरडी कोसळत असल्याने प्रशासनाने गडावरील पायरी मार्ग बंद केला
Published on

महाड : पावसाळ्यात रायगड किल्ल्यावर वारंवार दरडी कोसळत असल्याने प्रशासनाने गडावरील पायरी मार्ग बंद केला आहे. हा मार्ग बंद झाल्याने सुरक्षा रक्षकांनाही गडावर जाणे जोखमीचे झाले आहे.

गडावर जाण्यासाठी असलेल्या रोपवे चे भाडे सुरक्षारक्षकांना परवडणारे नसल्याने किल्‍ल्‍यावरील सुरक्षा व्यवस्था अडचणीत आली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाच सुरक्षारक्षक व सुरक्षा व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र दिसत आहे.

रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची, शिवप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवराज्याभिषेकदिन, शिवपुण्यातिथी अशा गडावर होत असलेल्या विविध कार्यक्रमांना लाखो शिवप्रेमी हजेरी लावतात.

किल्‍ल्‍यावर अनेक शिवकालीन ऐतिहासिक वास्तू असून त्‍यांच्या सुरक्षेसाठी पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. महादरवाजा, राजसदर, जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ, होळीचा माळ, बाजारपेठ आदी ठिकाणी हे सुरक्षारक्षक पहारा देत असून आता हेच सुरक्षारक्षक अडचणीत आले आहेत.

Raigad Fort
Raigad News : रायगड जिल्‍हा परिषदेची इमारत अतिधोकादायक; २०२१ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये खुलासा

किल्‍ल्‍याच्या पायरी मार्गावर आणि चित्त दरवाजामध्ये यंदा दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे संभाव्य दरडींचा धोका लक्षात घेत, रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग ३१ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर पर्यटकांना गडावर जाण्यास मनाई केली आहे. यामुळे गडावरील सुरक्षारक्षकांनाही पायी जाता येत नाही. रायगड रोपेने या सुरक्षारक्षकांना गडावर जाण्याची सुविधा आहे. परंतु दररोज लागणारे तीनशे रुपये रोपवेचा खर्च आणायचे कुठून,असा प्रश्न सुरक्षारक्षकांसमोर आहे.

Raigad Fort
Raigad : महिला रुग्णासोबत असभ्य वर्तन; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सध्या किल्‍ल्‍यावर १८ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. १५ जूनपासून पायरी मार्ग बंद करण्यात आल्‍याने सुरक्षारक्षकांना गडावर जाण्यात अडथळे येत आहेत. याबाबत सुरक्षारक्षकांनी स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा एजन्सीला पत्रही दिले आहे.

सुरक्षा रक्षकांना दिले जाणारे वेतन हे तुटपुंजे असल्याने दर दिवशी रायगड रोपवेचे ३१० रुपये भरल्यानंतर महिन्याचा पगार शिल्लक किती राहणार, असा प्रश्‍न त्‍यांनी उपस्‍थित केला आहे. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.

Raigad Fort
Raigad : महिला रुग्णासोबत असभ्य वर्तन; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पायरी मार्ग बंद असल्याने सुरक्षारक्षकांना रायगड रोपवे ने जाण्याची सूट दिली पाहिजे. रोपवेचे तिकीट अथवा पगारवाढ द्यावी, अशी रक्षकांची मागणी आहे. आम्ही याबाबत पुरातत्त्व विभाग व प्रशासनाशी चर्चा करीत आहोत. गडावरील ऐतिहासिक वास्तूंची सुरक्षेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
- प्रभाकर सावंत, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.