Mahad farmer news
Mahad farmer newssakal

Mahad News: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार परदेशवारी करण्याची संधी; जाणून घ्या निकश

Mahad News: The farmers of the state will go on study tours outside the country. Under thprogressive farmers are selected through committees at various levels. For more information contact Taluka Agriculture Officer office.
Published on

Mahad News: विदेशात वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा देशाचा विकास करत असतात. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्नात वाढ झाली आहे. अशा देशातील शेतकरी तेथील शास्त्रज्ञ यांच्याशी चर्चा, प्रत्यक्ष भेटीतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, याकरिता कृषी विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी उपलब्ध आहे.


राज्यातील विविध पिकांची उत्पादकता, पीक पद्धतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी उत्पादनांचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषी प्रक्रियेमधील अद्ययावत पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

शेतीशी निगडित घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत गरजेनुरूप योग्यवेळी पोहोचवणे आणि त्यासाठी आवश्यक साहाय्य तसेच सोयीसुविधा देणे निकडीचे आहे. त्यामुळे कृषी विस्तार कार्यक्रमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता विविध उपाययोजनांसाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.

Mahad farmer news
Mahad MIDC: महाड स्फोटातील ८ मृतदेह आढळले ; ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करणार

निवडीसाठीचे निकष -
- अभ्यास दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा, स्वतःच्या नावे चालू कालावधीचा ७/१२ व ८-अ उतारा असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे. सोबत शिधापत्रिकेची प्रत, आधार प्रमाणपत्राची प्रत आवश्यक आहे.
- शेतकरी किमान बारावी पास असावा. शेतकऱ्यांचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी २५ वर्षे पूर्ण व सहल समाप्त होण्याच्या अंतिम दिवशी ६० वर्षा पेक्षा जास्त नसावे. वैध पासपोर्ट असावा. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीस नसावा.
- वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टड अकाउंटंट), अभियंता, कंत्राटदार नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. शेतकऱ्याने यापूर्वी कोणत्याही विभागामार्फत अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.
- कोरोनाविषयक तपासणी करून तसा अहवाल कृषी आयुक्तालयाला सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग ७-१० दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.

Mahad farmer news
Mahad News : चवदार तळ्यावर आकर्षक दिव्यांचा होणार झगमगाट

‘या’ देशांची करणार सफर
- शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे होणार आहेत. या योजनेंतर्गत जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वित्झरलॅण्ड, ऑस्ट्रीया, न्यूझीलँड, नेदरलॅण्ड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलँड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर देशांची निवड करण्यात आली आहे. प्रगतशील शेतकऱ्यांची विविध स्तरावरील समित्यांमार्फत अंतिम निवड केली आहे.
- राज्य सरकारकडून अभ्यास दौऱ्याकरीता सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागामार्फत निवड झालेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्याच्या खर्चाचा संपूर्ण १०० टक्के हिस्सा प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरणा बंधनकारक आहे.

Mahad farmer news
Mahad News : गुगल मॅपमुळे दिशाभूल; दीडशे किलोमीटरचा फेरा...

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे होणार आहेत. या योजनेंतर्गत प्रगतशील शेतकऱ्यांची विविध स्तरावरील समित्यांमार्फत अंतिम निवड केली आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
- उज्ज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Mahad farmer news
Mahad : महाड शहराच्या पश्चिम भागाला कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा केला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()