Dog bite
Dog bite sakal

Dog Bite : निर्बीजीकरण बंद, महिनाभरात एक हजार श्‍वानदंश; लहान मुले, ज्येष्‍ठांमध्ये दहशत

दिवसांत कुत्र्यांचा प्रजनन कालावधी सुरू असतो, झुंडीने फिरत असणारे कुत्रे अधिक आक्रमक
Published on

Dog Attack : श्‍वान दंश झाल्‍यास सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावे, उपचार न घेतल्यास रेबिजची लागण होण्याची शक्यता असते. दमट वातावरणात रेबिजच्या विषाणूचा जास्‍त फैलाव होत असल्‍याने सल्ला पशुवैद्यकीय डॉक्टर देत आहेत. याच दिवसांत कुत्र्यांचा प्रजनन कालावधी सुरू असतो, झुंडीने फिरत असणारे कुत्रे अधिक आक्रमक होतात.

गेल्‍या महिनाभरात श्‍वानदंशाच्या एक हजार ८५९ घटना रायगड जिल्हात घडल्‍याची नोंद झाली आहे. जवळपास सर्वच तालुक्‍यांमध्ये भटक्‍या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. पावसाळी हंगामात कुत्रे अधिक आक्रमक होतात.

जिल्ह्यात सध्या कोणत्याही नगरपालिका, ग्रामपंचायतीकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण सुरू नाही. निर्बिजीकरणासाठी साधारण दोन हजार रुपये प्रत्येकी खर्च येत असल्याने ग्रामपंचायतींच्या आर्थिक कुवतीबाहेरचा हा खर्च आहे.

Dog bite
Dangerous Dogs : कुत्र्यांच्या सगळ्यात खतरनाक जाती, सिंहालाही फाडून खातील!

यामुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाणही वाढले आहे. पावसाळ्यात अन्न मिळत नसल्याने भटके कुत्रे अन्नाच्या शोधात असतात. दिवसरात्र टोळक्याने फिरणाऱ्या कुत्रांचा त्रास लहान मुलांबरोबर ज्‍येष्‍ठ नागरिकांनाही होतो.

याच दिवसात त्यांचा प्रजनन कालावधी असल्याने एकमेकांच्या संपर्कात येऊन विषाणूंचा फैलाव अधिक वेगाने होत असल्‍याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्‍यामुळे पावसाळ्यात कुत्रा चावला तर दिरंगाई न करता सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्‍ला दिला जात आहे.

Dog bite
Dog's Cry : कुत्रे रात्रीच का रडतात? काय आहे यामागचं खरं कारण?

भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ
कुत्र्यांचे निर्बीजीकरण होत नसल्याने संख्या वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. २०२१ पासून आतापर्यंत श्‍वानदंशाच्या ३९ हजार ९४७ घटना घडल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसते.

रात्रीचा फेरफटका मारणेही कठीण
ग्रामीण भागात राखणदार कुत्रे, तर शहरी भागात भटक्‍या कुत्र्यांची दहशत कायम आहे. दिवसाला सरासरी ८५ जणांना श्‍वानदंशाला सामोरे जावे लागत असल्याची स्‍थिती आहे. कुत्रांच्या दहशतीने शहरी भागात रात्रीचा फेरफटका मारणेही कठीण झाले आहे. रात्रपाळी करून येणाऱ्यांना याचा जास्तच त्रास होतो.

सूचना फलक गरजेचे
नव्याने येणाऱ्या व्यक्तीला येथे राखणेसाठी कुत्रा असल्याचे माहिती असल्‍याचा सूचना फलक लावणे गरजेचे आहे. किंवा कुत्र्याला बंदिस्त जागेत व्यवस्थित बांधून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे कुत्र्यांकडून अचानक होणारे हल्ले कमी होतील.

Dog bite
Stray Animals in Kerala : केरळमध्ये भटक्या कुत्र्यांची हत्या, भटक्या प्राण्यांना मारण्यासाठी कोणते कायदे आहेत?

रेबिजच्या अवस्था
सुस्त अवस्था ः रेबिजच्या विषाणूंने त्या प्राण्याच्या मेंदूवर ताबा मिळवला असेल तर त्यातील पहिल्या प्रकारात तो प्राणी कोणतीही हालचाल करीत नाही. तो सुस्तपणे बसतो. या अवस्थेत त्‍याला जबडा फार घडता येत नाही. त्यामुळे त्याला अन्नपाणी घेता येत नाही. यामुळे त्याची प्रकृती खालावते.
आक्रमक अवस्था ः या स्थितीत प्राणी अधिक आक्रमक असतो. त्याचा जबडा उघडा असल्याने समोर येणाऱ्या प्रत्येकास तो जावा घेतो. त्याच्या हालचालींवर नियंत्रण नसते. डॉक्टरांच्या मते असे कुत्रे अधिक आक्रमक असतात. या दोन्ही प्रकारात लागण झालेला कुत्रा पाणी पित नाही.

रेबिजची लक्षणे
* निद्रानाश,
* पाण्याची भीती वाटणे,
* सतत लाळ गळणे,
* सुस्‍त पडून राहणे,
* हालचालींवर ताबा नसणे,
* ताप येत राहणे, डोकेदुखी,
* नाकातून डोळ्यांतून आणि कानांतून पस तत्सम घाण पाणी बाहेर येणे
* उगाचच भुंकणे अथवा आक्रमण होत अंगावर येणे

Dog bite
Dog Bite : पुणे शहरात वर्षभरात श्वानदंशाच्या १६ हजार ५६९ घटनांची नोंद

अंतिम स्थितीत गेलेल्या रेबिजवर आपल्या देशात खात्रीशीर उपचार
नाही. या स्थितीत गेलेल्या प्राण्यापासून दुसऱ्या पाळीव प्राण्यांना लागण होऊ नये यासाठी बाधित प्राण्याला मृत्यू देण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे तो होऊ नये यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे असते. उपद्रवी प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘एबीसी’ हा उपक्रम चालवला जातो. त्याचबरोबर निर्बिजीकरणाची प्रक्रियाही खर्चिक असल्याने नगरपालिका, ग्रामपंचायतींकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे.
- डॉ. एस.पी. डवरे, पशुधन विकास अधिकारी, रायगड
श्‍वानदंशाचे प्रकार वाढत आहेत. श्वानदंशावर सरकारी रुग्णालयात मोफत उपचार होतात. त्यामुळे एखाद्यास श्‍वानदंश झाल्‍यास वेळ न घालवता त्वरित उपचार सुरू करावेत. पावसाळ्यात श्वानदंशाच्या घटना वाढत असल्याने रुग्णालयात लसीचा जादा साठा ठेवावा लागतो.
- डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी,

Dog bite
Dog Bite : तीन महिन्यात 972 जणांना कुत्र्यांनी घेतला चावा; भटक्या व घरगुती कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर

२०२१ - ८,७५७
२०२२ - ९,१३८
२०२३ - १०, ६२५
२०२३ (आतापर्यंत) - ६,४२७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()