Anuskura Ghat : दरड कोसळल्याने अणुस्कुरा घाटातील वाहतूक तब्बल 15 तास बंद; रस्त्यात पडलेले दगड-माती हटविण्याचे काम सुरु

ही दरड हटविण्याचे काम आज सकाळपासून हाती घेण्यात आले आहे.
Anuskura Ghat
Anuskura Ghatesakal
Updated on
Summary

अणुस्कुरा घाटात काल सायंकाळी दरड कोसळल्याने घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

राजापूर : पश्चिम महाराष्ट्राशी रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या तालुक्यातील अणुस्कुरा घाटात (Anuskura Ghat) काल सायंकाळी दरड कोसळली. ही दरड हटविण्याचे काम आज सकाळपासून हाती घेण्यात आले आहे. मात्र, रस्त्यामध्ये पडलेले दगड मोठं-मोठे असल्याने ते बाजूला करताना अडथळे येत आहेत. अशा स्थितीत ही बांधकाम विभागाने (Construction Department) दगड हटविण्याचे वेगाने काम सुरू केले आहे.

सायंकाळपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, अणुस्कुरा घाटातील वाहतूक 15 तासांपासून बंद आहे. दरड कोसळण्याची यावर्षीची ही पहिलीच घटना आहे. अणुस्कुरा घाटात काल सायंकाळी दरड कोसळल्याने घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

Anuskura Ghat
Anuskura Ghat : पश्‍चिम महाराष्ट्राशी जोडणारा अणुस्कुरा घाटातला प्रवास ठरतोय जीवघेणा; घाटमार्गात कोसळताहेत दरडी

वाहनांची नियमित वर्दळ असलेल्या या घाटात दरड कोसळण्याची यावर्षीची ही पहिलीच घटना ठरली आहे. रस्त्यामध्ये पडलेले दरड, मोठे दगड आणि जेसीबीच्या सहाय्याने माती हटविण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.