बांदा - दोडामार्ग मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू 

Traffic Jam on Banda Dodamarg Route Sindhudurg Marathi News
Traffic Jam on Banda Dodamarg Route Sindhudurg Marathi News
Updated on

बांदा ( सिंधुदुर्ग ) - बांदा - दोडामार्ग राज्य मार्गावर आज सकाळी नऊ वाजता पानवळ येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्यानजीक असलेले आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनी हे झाड जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

गेले दोन दिवस येथील परिसरात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. आज सकाळी वादळी वाऱ्यामुळे पानवळ डेगवे सीमेवर असलेला भलामोठा आम्रवृक्ष रस्त्यावर कोसळला. मोरगाव येथील पिरणकर हे बांद्याच्या दिशेने येताना त्यांनी ही घटना बांद्याचे माजी सरपंच बाळा आकेरकर यांना सांगितली.

बाळा आकेरकर, पानवळ येथील स्थानिक शशिकांत पित्रे, निनाद पित्रे, समीर पेळपकर आदींनी याठिकाणी धाव घेत कोसळलेले झाड बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे वाहतूक खोळंबली. 

अडकलेल्या वाहनांत दोडामार्ग - सावंतवाडी एसटीचा सामावेश होता. या एसटी बसचे चालक भगवान राऊळ यांनी स्वतः कटर हातात घेत झाडाच्या फांद्या छाटत मदतकार्य केले. रिमझिम पाऊस सुरू असतानाही झाडाच्या वर चढत समीर पेळपकर व भगवान राऊळ यांनी झाडाच्या फांद्या तोडत झाड मोकळे केले. त्यांनतर रोणापाल येथून जेसीबी मागवत हे झाड रस्त्यावरून बाजूला करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडल्याने रस्त्याच्या दुतर्फा रांग लागली होती. बांदा पोलिसांनी याठिकाणी येत वाहतूक सुरळीत केली. 

मोटारचालक बचावला 
झाड पडल्यानंतर वेलींच्या आधारावर ते अधांतरी होते. यातूनच एका स्विफ्ट मोटारचालकाने जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी झाडाची फांदी तुटून खाली पडली. सुदैवाने ही फांदी कारच्या मागच्या भागावर पडल्याने मोठा अनर्थ टळला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.