चिपळूण : नाताळची सुटी(christmas holiday) सुरू असल्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांची(tourist) गर्दी वाढली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी (new year) पर्यटकांच्या गर्दीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर(mumbai-goa highway) वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही होत आहे.सध्या नाताळची सुटी सुरू असल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पुण्याहून तसेच पश्चिम महाराष्ट्रातून गुहागर आणि दापोलीकडे जाणारे पर्यटक मुंबई-गोवा महामार्गावरून चिपळूण मधून पुढे जात आहेत. कमी अंतराचा प्रवास म्हणून अनेकांनी दापोली गुहागर आणि मंडणगड तालुक्यातील पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन केले आहे.
अनेक पर्यटक दोन ते तीन दिवसांसाठी कोकणात दाखल होत आहेत. पर्यटनस्थळी असलेली हॉटेल, लॉज यापूर्वी बुक झाले आहेत. काही ठिकाणी जादा भाडे देऊन पर्यटक राहत आहेत. चिपळूण राहण्याच्या आणि जेवणाच्या दृष्टीने उत्कृष्ट आणि सोयीचे ठिकाण असल्यामुळे लांबचा प्रवास करून येणारे पर्यटक राहण्यासाठी चिपळुणला पसंती देत आहेत. दोन दिवसांपासून शहरातील आणि मुंबई-गोवा महामार्गावर चारचाकी वाहनांची गर्दी वाढली आहे. अनेक वेळा ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडवावी लागते. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जागोजागी वाहतूक पोलिसांची गरज आहे. बहादूरशेख नाका येथे सायंकाळी पोलिस तैनात असतात. दिवसभर मात्र वाहन चालकांना आणि ग्रामस्थांना कोंडीतून मार्ग काढत पुढे जावे लागत आहे.
बाहेरून आलेल्यांची गैरसोय
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे सीएनजीचा एकमेव पंप आहे. शहरातील आणि पर्यटकांची वाहने या पंपावर सीएनजी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. सीएनजी शिल्लक राहत नाही.
मागील दोन वर्षे कोरोनामध्ये गेली. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे दोन वर्षे तोटा सहन करावा लागला. या वर्षी पर्यटकांचा ओघ वाढला आहे. सध्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी होत असली तरी पुढील दोन दिवसांत ही गर्दी कमी होईल. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी येणाऱ्यांचे स्वागतच केले पाहिजे.
- विशाल कदम, कळंबस्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.