'या' घाटात तब्बल 16 तास वाहतूक कोंडी; कंटेनर कठड्याला धडकून रस्ता पूर्णपणे बंद, प्रवाशांचे हाल

कंटेनरने पूर्ण रस्ताच व्यापल्याने घाटातून होणारी वाहतूक ठप्प झाली.
Tilari Ghat Dodamarg Sindhudurg
Tilari Ghat Dodamarg Sindhudurgesakal
Updated on
Summary

गोव्याहून पर्यटनाचा आनंद लुटून गावी परतणाऱ्या व पर्यटनासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांचा खोळंबा झाला.

दोडामार्ग : तिलारी घाट (Tilari Ghat) उतरत असताना तीव्र उताराच्या वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटून कंटेनर थेट कठड्याला धडकला. कंटेनरने पूर्ण रस्ताच व्यापल्याने घाटातून होणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तब्बल सोळा तासांनंतर क्रेनच्या साहाय्याने अडकलेला कंटेनर (Container) बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की : कंटेनर सोमवारी (ता. २७) रात्री घाटमाथ्यावरून तिलारी घाटमार्गे गोव्याला जात होता. चालकास हा घाट नवा होता. घाटाच्या पूर्वार्धातच तीव्र उतार पाहून चालकाची भीतीने गाळण उडाली. ट्रक तीव्र उताराच्या वळणावर आला असता, चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक संरक्षक कठड्याला धडकला.

Tilari Ghat Dodamarg Sindhudurg
Kolhapur Dam Update : काळम्मावाडीत जास्त, तर राधानगरीत कमी पाणीसाठा; कोल्हापुरातील 'या' 8 धरणांत किती आहे पाणी?

परिणामी ट्रक खोल दरीत कोसळण्यापासून बचावला व मोठा अनर्थ टळला. ट्रक रस्त्यातच अडकून पडल्याने फक्त दुचाकी जाण्यासाठी मार्ग शिल्लक राहिला. चारचाकी व इतर वाहनांसाठी मार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली. गोव्याहून पर्यटनाचा आनंद लुटून गावी परतणाऱ्या व पर्यटनासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांचा खोळंबा झाला.

Tilari Ghat Dodamarg Sindhudurg
Women Death Case : महालिंगपूरममध्ये गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू; सांगलीतील डॉक्टर ताब्यात, चार डॉक्टरांची नावेही निष्पन्न

काल सकाळच्या सत्रातील एसटी बसेसनादेखील याचा फटका बसला. त्याने प्रवाशांची गैरसोय झाली. सकाळी जेसीबीच्या साहाय्याने ट्रक बाजूला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. मात्र, यात ट्रक काहीसा बाजूला झाल्याने चारचाकी वाहने मार्गस्थ झाली. शिवाय काही एसटी बसचालकदेखील बस काढण्यात यशस्वी झाले. तब्बल सोळा तासांनंतर सकाळी घाटातून बाहेर काढला व रस्ता खुला झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.