हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
पाली - हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी (Birds) रायगड जिल्ह्यात (Raigad District) दाखल झाले आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षक व पर्यटक (Tourist) सुखावले आहेत. पक्षी अभ्यासक व निरीक्षकांना ही मोठी पर्वणीच आहे.
सद्यस्थितीत सुमारे 22 हजार ते 25 हजार किलोमीटरचा प्रवास करून अमुर ससाने रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दाखल झाले आहेत. जवळपास 30 ते 35 संख्येने अमुर ससाने या भागात पक्षी अभ्यासक राम मुंडे यांना दिसून आलेले आहेत. या भागात एमआयडीसी असल्याने येथे उंचच उंच लाईटचे टॉवर आहेत आणि या टॉवरच्या तारेवर सकाळच्या व संध्याकाळच्या वेळेला अमुर ससाने थव्याने बसलेले दिसून येत होते. वाढलेल्या गवतावरील किडे, कीटक ,छोटे पक्षी यांची शिकार करून आपली उपजीविका भागवणारे हे शिकारी पक्षी जवळपास पंधरा दिवस या भागात मुक्कामासाठी होते मागील दोन दिवसापूर्वी हे स्थलांतरण करून पुढे निघून गेले आहेत. अद्यापही एखादा पक्षी या भागात निरीक्षण केले असता दिसून येतो. याबरोबरच ऑर्च बिल्लीयड फ्लायकॅचर, ठिपकेवाला तुतारी, काळया डोक्याचे भारीट व हिमालयन बुलबुल व इतरही देशी व विदेशी प्रवाशी व स्थलांतरित पक्षी जिल्ह्यातील विविध भागात दाखल झाले आहेत.
जंगलाला लावल्या जाणाऱ्या वनव्यांमुळे स्थलांतरित कीटक मरतात. परिणामी या पक्षांना खाद्य मिळत नाही. त्यामुळे पर्यावरणातील समतोल ढासळत चालला आहे. वणवा लावण्याचे प्रमाण जर कमी झाले तर आपल्या भागात भविष्यात आणखी विविध स्थलांतरित पक्षी येतील.
- राम मुंढे, पक्षी अभ्यासक
मुबलक खाण्यासाठी प्रवास
थंडीच्या दिवसात जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारे खाद्य, पावसाळा संपला की जंगल, उघडी माळराने, शेते यामध्ये गवताची वाढ मोठ्या प्रमाणात होते. या गवतावर थंडीच्या दिवसात कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते आणि या कीटकांना खाण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून प्रवासी पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
अमुर ससाणा
अमूर ससाणा हा एक स्थलांतरित शिकारी पक्षी असून, तो महिन्याभरात जवळपास 22 ते 25 हजार किलोमीटरचा प्रवास करतो. तो मुळात रशिया मधल्या सायबेरिया क्षेत्रातील निवासी आहे. रशिया आणि चीन या देशाची नैसर्गिक सीमा जगातील दहाव्या क्रमांकाची अमुर नावाची नदी आहे. आणि या नदीच्या नावावरून या पक्षाचे नाव अमुर ससाणा असे पडले आहे. अमुर नदीच्या भागातच या पक्षाचे प्रजनन होते परंतु नोव्हेंबर महिन्यात बर्फ पडण्याच्या अगोदर हा पक्षी आपल्या उपजीविकेसाठी प्रवास करण्यास सुरुवात करतो. तो अमुरहुन चीन मार्गे भारतात दाखल दाखल होतो. भारतात याचा मुक्काम काही महिने असतो. भारतामध्ये विविध भागातून ते नागालँड या राज्यात हजारोंच्या संख्येने एकत्र येतात आणि काही दिवस तेथे मुक्काम करून ते प्रवास करून आफ्रिका या देशात निघून जातात. अशा रीतीने तो प्रवास करत असताना पाच दिवसात पाच हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास करतो. एवढा प्रवास हा पक्षी कमी दिवसात कसा करू शकतो हे पक्षीतज्ञांना पडलेले कोड आहे.
हिमालयन बुलबुल (Himalayan Bulbul)
मुळात हिमालयात वास्तव्यात असणारे हे पक्षी सध्या स्थलांतरण करून रायगड जिल्ह्यात दाखल झालेले झालेले आहेत, माणगाव तालुक्यातील पाटणुस, ताम्हिणी घाटाच्या पायथ्याशी हे पक्षी सध्या थव्याने उडताना दिसून येत आहेत. थंडीच्या दिवसात हिमालयात बर्फ पडत असल्याने हे पक्षी आपल्याकडे स्थलांतरित होऊन येतात.
विशिष्ट आवाजामुळे हे पक्षी लक्ष वेधून घेत असतात. विविध झाडांची फळे कीटक फुलांमधील मकरंद खाताना हे पक्षी निरीक्षकांना दिसून येत आहेत. संपूर्ण काळया रंगाचे शरीर असणाऱ्या या पक्ष्याचे पाय व चोच लाल रंगाची असते. थंडी कमी झाली की ते पुन्हा परत स्थलांतरण करून परतीच्या प्रवासाला लागतात.
ऑर्च बिल्लीयड फ्लायकॅचर (Orche-bellied flycatcher)
हा पक्षी आकाराने अगदी लहान असतो. दाट झाडी वेली आणि करवंदीच्या जाळ्या मध्ये पाण्याच्या जवळ इतर कीटक पकडणाऱ्या पक्षांबरोबर हा सध्या दिसून येत आहे. या पक्षाला कॅमेऱ्यात कैद करणे फार कठीण काम आहे कारण तो प्रचंड वेगाने हालचाल करत कीटक पकडणारा पक्षी आहे हा पक्षी दक्षिण मेक्सिको पासून अँडीजच्या पूर्वे पर्यंत दक्षिण ब्राझील पासून त्रिनिदाद पर्यंत या भागात आढळणारा पक्षी आहे.
ठिपकेवाला तुतारी (wood sandpiper)
हा पक्षी थंडीच्या दिवसात नदीच्या पात्रात पाणथळ जागेत शेतात साठलेल्या पाण्यात जल कीटक आळ्या शंख-शिंपले खातांना दिसून येतो. हा पक्षी मुळात युरोपमधील सब आर्टिक आर्द्र प्रदेशातला तो आफ्रिका दक्षिण आशिया मार्गे भारतात स्थलांतर करून येतो आणि थंडीचे दिवस संपले की परतीच्या प्रवासाला लागतो.
काळया डोक्याचे भारीट पक्षी (black headed bunting)
गवताळ प्रदेशात गवतावरील बीया खड्ड्यामध्ये भात झोडणी नंतर राहिलेले धान्य खाण्यासाठी हे पक्षी सध्या दिसून येत आहेत. हिवाळ्यात पूर्व युरोप आणि पूर्व इराण हुन स्थलांतर करून येणारे हे पक्षी हजारोच्या संख्येने भारतात दाखल होतात. जवळपास सात हजार किलोमीटरचा प्रवास करून उपजीविकेसाठी ते आपल्या रायगड जिल्ह्यात दाखल झालेली दिसून येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.