Olive Ridley Turtle : 13 वर्षांत समुद्रात झेपावली तब्बल 55,916 कासवे; दापोली, आंजर्ले, मंडणगडमध्ये घरटी सापडण्याचे प्रमाणही जास्त

दापोली वन परिक्षेत्रामध्ये कासव संवर्धन (Turtle Conservation) व संरक्षणाचे काम जोमाने सुरू आहे.
Turtle Conservation
Turtle Conservationesakal
Updated on
Summary

दापोली तालुक्यातील आंजर्ले आणि मंडणगड (Mandangad) तालुक्यातील वेळास या ठिकाणी घरटी सापडण्याचे प्रमाण जास्त आहे.

रत्नागिरी : दापोली वन परिक्षेत्रामध्ये कासव संवर्धन (Turtle Conservation) व संरक्षणाचे काम जोमाने सुरू आहे. २०११ पासून तेरा वर्षांमध्ये ऑलिव्ह रिडले (Olive Ridley Turtle) या समुद्री कासवाच्या ५५ हजार ९१६ संघर्षयात्री कासव पिल्‍ले स्वतंत्र जीवनासाठी समुद्रात झेपावली. दापोली, मंडणगड व खेड तालुक्यांचा या वन परिक्षेत्रामध्य समावेश आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली (मौजे दाभोळ, लाडघर, कर्दे, मुरूड, कोळथरे, आंजर्ले, केळशी) व मंडणगड (मौजे वेळास) या दोन तालुक्यांतील आठ समुद्रकिनारी समुद्री कासवे आपली घरटी तयार करतात. त्यामध्ये दापोली तालुक्यातील आंजर्ले आणि मंडणगड (Mandangad) तालुक्यातील वेळास या ठिकाणी घरटी सापडण्याचे प्रमाण जास्त आहे.

Turtle Conservation
Turtle Conservationesakal

असे होते संवर्धन...

कासवमित्र रात्री समुद्रकिनारी गस्त घालतात. या कालावधीमध्ये समुद्री कासवांनी तयार केलेली घरटी शोधली जातात. घरट्यांमध्ये घातलेली अंडी योग्य पध्दतीने खड्डा खोदून, हाताळून समुद्र किनारी जाळीबंद हॅचरीमध्ये कृत्रिमरित्या वाळूमध्ये उबवण्यासाठी ठेवली जातात.

Turtle Conservation
Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटात खरंच लुटारू आहेत, घाटातून प्रवास करणं असुरक्षित? पोलिसांनी सांगितलेली Real Story काय?

अंडी उबविण्यासाठी न थांबणारे कासव

ऑलिव्ह रिडले समुद्री मादी कासव रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यापासून थोड्या अंतरावर वाळूमध्ये खड्डा तयार करते. वाळूच्या खाली १००-१५० या प्रमाणात अंडी देते. पुन्हा वाळूच्या साहाय्याने अंडी बुजवते आणि समुद्रामध्ये निघून जाते. अंडी वाळूच्या खड्ड्यांमध्ये स्वतःच उबतात. समुद्री कासव इतर प्राण्याप्रमाणे त्या जागी अंडी उबवण्यासाठी थाबंत नाहीत.

Turtle Conservation
Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

जन्मापासून आई-वडिलांची भेट न होणारी पिल्ली

पहिल्या दिवसापासून स्वतंत्र जीवन जगणारी आणि उभ्या आयुष्यात आई-वडिलांची भेट न होणारी कासवाची पिल्ले ही जगाच्या पाठीवर एकमेव असावीत. या स्वतंत्र जीवनासाठी त्यांना मांस भक्षी, पक्षी, प्राणी यांच्यापासून बराच संघर्ष करावा लागतो. ही संघर्ष यात्रा निश्चितच सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. ४० ते ४५ दिवसांत ती उबवतात.

दृष्टिक्षेपात..

  • अंदाजे वयोमर्यादा : ५० वर्षांपर्यंत

  • अंडी देण्याची क्षमता : ४० ते १७० पर्यंत

  • अंडी उबविण्याचा कालावधी : ४५-५५

  • विणीचा हंगाम : प्रामुख्याने नोव्हेंबर, मे, मार्च

  • आहार : एकपेशीय वनस्पती, लॉबस्टर, खेकडे, मॉलस्क, कोळंबी मासा आणि इतर लहान मासे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()