अपहरण प्रकरणाला वेगळे वळण ; कर्ज फेडले म्हणणाऱ्याविरोधातच तक्रार

twist in ratnagiri kidnapping case
twist in ratnagiri kidnapping case
Updated on

रत्नागिरी - कर्ज २५ लाख, तरीही ५५ लाख फेडूनही पुण्यातील सहा संशयितांनी गाडी व रोख रक्कम घेऊन अपहरण केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देणाऱ्या फिर्यादीवरच कोट्यवधी रुपयांना फसविल्याची तक्रार दाखल केली आहे. भोर (ता. पुणे) पोलिसांनी रत्नागिरीतून दोन दिवसांपूर्वी त्याला ताब्यात घेतले. भोर पोलिस ठाण्यात येथील तक्रारीतील संशयिताने दिलेल्या फसवणुकीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

संतोष विश्‍वनाथ जगदाळे (वय ४०, रा. गोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे. सध्या शिवाजीनगर, रत्नागिरी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. २ डिसेंबरला संतोष जगदाळे याने शहर पोलिस ठाण्यात गणेश रामचंद्र शेडगे (रा. भोर, पुणे) आणि अन्य पाच जणांविरुद्ध तक्रार दिली होती. सावकारी पैशांच्या व्यवहारातून संशयितांनी २० लाखांची मोटार व रोख १० हजार घेऊन अपहरण केल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणी गणेश शेडगे यांनी पुणे-भोर पोलिस ठाण्यात संतोष जगदाळे याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की आपण कंत्राटदार असून, आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे. मात्र, सध्या धंद्यात मंदी आली. आपल्याला पैशांची खूप गरज असल्याचा बनाव रचून संतोष जगदाळेने अनेकांकडून लाखो रुपये उकळले. भोर पोलिस ठाण्यात फसवणूक झालेल्यापैकी गणेश शेडगे, दशरथ महागरे, मिलिंद जगताप, संकेत महांगरे, सागर राऊत, संतोष वीर, विशाल महांगरे, सतीश देवकाते आदींना जगदाळेने वेगवेगळी आमिषे दाखवून एक कोटीहून अधिक रकमेचा गंडा घातल्याचा आरोप जगदाळे याच्यावर आहे.

काहींकडून मोटार, ट्रॅक्‍टर देतो, असे सांगून त्याने पैसे घेतले आहेत. त्याचप्रमाणे महाबळेश्‍वर येथे मोक्‍याच्या ठिकाणी आपली जमीन असून, ती नावावर करण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी फसवणूक झालेल्यांनी येथील जगदाळे याच्याविरोधात भोर पोलिस ठाण्यात स्वतंत्रपणे लेखी तक्रारी दिल्या आहेत.

कोकण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे. पैशांची मागणी करण्यासाठी जाणाऱ्यांविरोधातच खोट्या तक्रारी करून त्यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न संशयित जगदाळे करीत असल्याचा आरोप फसवणूक झालेल्यांनी केला आहे. या तक्रारीवरून भोर पोलिसांच्या पथकाने रत्नागिरीत येऊन जगदाळे याला ताब्यात घेतले असल्याची माहिती शहर पोलिसांकडून मिळाली.


धक्काबुकी केल्याची तक्रार
संशयितांनी अपहरण करताना १० हजार रुपये काढून घेतले. पाली, हातखंबा, संगमेश्‍वर प्रवासात धक्काबुकी केली. त्यानंतर २० लाखांची मोटार घेऊन पलायन केले, असे जगदाळेने रत्नागिरीत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.