Ratnagiri : वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांच्या हाती लागली 150 जणांची यादी, 2 बडे मोहरे अडकले जाळ्यात

रत्नागिरी शहरातील वेश्या व्यवसायाच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे तपासात उघड होत आहे.
Two arrested in Ratnagiri connection with prostitution racket
Two arrested in Ratnagiri connection with prostitution racketesakal
Updated on
Summary

सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली जाणार आहे. रत्नागिरी तालुका, जिल्हा आणि बाहेरच्या अनेकांचा यामध्ये समावेश आहे.

रत्नागिरी : शहरातील वेश्या व्यवसायाच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे तपासात उघड होत आहे. या प्रकरणामध्ये सापडलेल्या डायरीमध्ये १५० जणांची यादी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील २ बडे मोहरे सापडले आहेत.

अमली पदार्थ तस्करीमध्येही ते सामील असून, त्यांना अटक केली आहे. काहींचे सीडीआर काढण्यात येणार असून, सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली जाणार आहे. रत्नागिरी तालुका, जिल्हा आणि बाहेरच्या अनेकांचा यामध्ये समावेश आहे.

Two arrested in Ratnagiri connection with prostitution racket
Koyna Dam Update: महापुराची धास्ती! महाराष्ट्राचं 'आलमट्टी'वर तर कर्नाटक शासनाचं 'कोयने'वर लक्ष्य; दोन्ही धरणांत किती आहे साठा?

सर्वांवर कारवाई करून या अनैतिक व्यवसायाला पायबंद घातला जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. अब्दुल मतीन हसनमियाँ डोंगरकर (३६, रा. बोर्डिंग रोड माळनाका, रत्नागिरी) आणि ओमकार जगदीश बोरकर (चिंचखरी, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असल्याचे त्यांनी सांगितले.

Two arrested in Ratnagiri connection with prostitution racket
Radhanagari Dam : संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलेल्या राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

शहरातील मध्यवर्ती आणि उच्चभ्रू ठिकाणी एका फ्लॅटमध्ये दोन तरुणींचा वापर करून राजेंद्र रमाकांत चव्हाण वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात उघड झाले. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने २० जुलैला दुपारी चव्हाण याला अटक केली. तसेच दोन पीडित महिलांना ताब्यात घेतले. संशयिताला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत रवानगी केली.

त्याची कसून चौकशी केल्यावर त्याच्या मोबाईल क्रमांकाच्या सीडीआरवरून त्याच्या या दोन साथीदारांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निश्चित झाले. हे तिघेही या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाल्यावर आज शहर पोलिसांनी या दोन्ही संशयितांना अटक केली. दरम्यान, राजेंद्र चव्हाणच्या पोलिस कोठडीचीही मुदत मंगळवारी संपली.

Two arrested in Ratnagiri connection with prostitution racket
Konkan Rain : महापुराचा धोका! इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर रत्नागिरीतील 571 कुटुंबांमधील 1700 लोकांचं स्थलांतर

त्यामुळे या तिन्ही संशयितांना एकत्रित न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत केली. या प्रकरणी शहर पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या डायरीमध्ये १५० जणांची यादी आहे. या यादीत सर्वसामान्य नाहीत तर बडी धेंडे असल्याची माहितीही पुढे येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.