Konkan Railway: कोकण रेल्वेचा दोन दिवस मेगा ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील कुमटा ते बटकळ आणि रत्नागिरी ते वैभववाडी रोड या विभागातील रेल्वे मार्गाच्या आणि मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय झाला आहे. येत्या ९ आणि १० नोव्हेबर रोजी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने काही गाड्याच्या प्रवासावर परिणाम होणार आहे.
या मार्गावरील कुमटा - भटकळ विभागात ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या वेळेत तीन तासांचा हा मेगा ब्लॉक असल्याने गाडी क्र.१६५८५ बंगळुरू ते मुर्डेश्वर एक्स्प्रेसचा प्रवास ८ नोव्हेंबर रोजी भटकळ स्टेशनवर अल्पकाळ थांबेल आणि भटकळ ते मुर्डेश्वर विभागादरम्यान अंशतः रद्द केला जाईल.
गाडी क्र. १६५८६ मुर्डेश्वर ते बंगळुरू एक्स्प्रेसचा प्रवास ९ नोव्हेबर रोजी भटकळ स्थानकावरून नियोजित वेळेवर सुरू होईल आणि मुर्डेश्वर ते भटकळ विभागादरम्यान अंशतः रद्द होईल. गाडी क्र. २२११४ कोचुवेली ते लोकमान्य टिळक (एलटीटी) एक्स्प्रेसचा प्रवास ९ नोव्हेंबर रोजी सुरू होणारा भटकळ स्टेशनवर २० मिनिटांसाठी नियमित केला जाईल.
दरम्यान, रत्नागिरी ते वैभववाडी रोड विभागात १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते ११ असा एकूण अडीच तासांचा मोगा ब्लॅाक असल्याने काही रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार आहे. यात गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास ९ नोव्हेंबर रोजी उडुपी ते कणकवली विभागादरम्यान अडीच तासांसाठी नियमित केला जाईल. गाडी क्र.१०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेसाचा प्रवास सावंतवाडी रोड ते कणकवली स्टेशन दरम्यान १० नोव्हेंबर रोजी ३० मिनिटांसाठी नियमित केला जाईल.
गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी ते मडगाव १० नोव्हेंबर रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी स्थानकावर दहा मिनिटांसाठी नियमित केला जाईल. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.