Sindhudurg Crime : 14 खलाशांना घेऊन जाणारी बोट निवती समुद्रात उलटली; दोन खलाशांचा बुडून दुर्दैवी अंत

Nivati ​​sea Sindhudurg : समुद्रकिनाऱ्यापासून २०० मीटर अंतर असताना ही दुर्घटना घडली. यातील १४ खलाशांपैकी दोन खलाशांचा मृत्यू झाला.
Nivati ​​sea Sindhudurg
Nivati ​​sea Sindhudurgesakal
Updated on
Summary

या घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर निवती गावासह पंचक्रोशीतही शोककळा पसरली आहे.

Sindhudurg Crime : निवती समुद्रातून (Nivati ​​Sea) मच्छीमारी करून येत असताना निवती येथील मच्छीमार आनंद धुरी यांच्या मालकीची (धनलक्ष्मी) बोट समुद्रात पलटी होऊन दोन खलाशांचा मृत्यू झाला. या बोटीमध्ये एकूण १४ खलाशी होते. ही घटना मध्यरात्री रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच निवती सरपंच अवधूत रेगे यांनी मध्यरात्री घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.

याविषयी सविस्तर माहिती अशी, शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास निवती येथील मच्छीमार आनंद धुरी यांच्या मालकीची असलेली बोट नेहमीप्रमाणे १४ खलाशांना घेऊन समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीनंतर मासेमारी करून निवती समुद्राच्या किनारी परतीचा प्रवास करत असताना किनाऱ्याजवळ असलेल्या म्हणजेच, ज्या ठिकाणी समुद्र आणि खाडी एकत्रित येतात त्या ठिकाणीही दुर्घटना घडली.

Nivati ​​sea Sindhudurg
Kolhapur Crime : कागलमध्ये विवाहितेनं संपवलं जीवन; पतीसह सासूला अटक, लहान बाळाचा रडताना आवाज आला अन्...

समुद्रकिनाऱ्यापासून २०० मीटर अंतर असताना ही दुर्घटना घडली. यातील १४ खलाशांपैकी दोन खलाशांचा मृत्यू झाला. त्यात मृत्यू झालेले आनंद पुंडलिक पराडकर (वय 58) हे श्रीरामवाडी येथील आहेत. पराडकरांचा मृत्यू बोट पलटी होऊन जाळ्यात अडकून राहिल्यामुळे झाला, तर दुसरे मृत व्यक्ती रघुनाथ उर्फ भाऊ येरागी खलाशी हे खवणे येथील आहेत, त्यांचे वय ४८ वर्षे असून हे दोन्ही खलाशी बाजूच्या गावातील वेंगुर्ले तालुक्यातील आहेत.

या घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर निवती गावांसह पंचक्रोशीतही शोककळा पसरली आहे. या मृत खलाशांची निवती पोलीस ठाण्यात नोंद असून त्यांना परुळे येथे शवविच्छेदनसाठी आणण्यात आले होते, अशी माहिती निवती ग्रामपंचायत सरपंच अवधूत रेगे यांनी दिली. यावेळी मदतकार्यासाठी निवती सरपंच अवधूत रेगे, उपसरपंच गोविंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रज्योत मेतर, माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश सारंग व निवती ग्रामस्थ मदत करण्यासाठी धावून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()