'राणेंच्या अटकेसाठी दबाव टाकल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास'

uday samant
uday samantuday samant
Updated on
Summary

कदाचित देश पातळीवर पहिल्या पाच क्रमांकात उद्धव ठाकरे यांचे नाव आल्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठला असण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी - नारायण राणेंच्या (narayan rane) कोकणातल्या जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी जमावबंदी लागू केल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे. मात्र या यात्रेसाठी जमावबंदी लागू करण्यात आलेली नाही, असे पालकमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच राणे यांच्या अटकेसाठी मी दबाव टाकला असल्याचं सिद्ध झालं तर राजकारणातून संन्यास घेईन असही त्यांनी म्हटंलं आहे. ते आज रत्नागिरी (ratnagiri district) जिल्ह्याला दौऱ्यावर आहेत.

uday samant
सोयामीलबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; सोयाबीन उत्पादकांना फटका

यावेळी ते म्हणाले, कुणी येणार आहे म्हणून मी आज जिल्हा दौऱ्यावर आलो नाही. उद्या मी सिंधुर्दुगच्या दौऱ्यावर असणार आहे. हा निव्वळ योगायोग आहे. काल जी कारवाई झाली ती कायदेशीर होती. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपल्या नेत्याबद्दल अभिमान असतो. आम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल (cm uddhav thackeray) अभिमान आहे. ते अतिशय चांगले काम करत आहेत. कदाचित देश पातळीवर पहिल्या पाच क्रमांकात उद्धव ठाकरे यांचे नाव आल्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठला असण्याची शक्यता आहे.

uday samant
'उद्या रत्नागिरीतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात' : प्रमोद जठार

पुढे ते म्हणाले, काहींनी पदाचा गैरवापर करून अशा पद्धतीची जमाबंदी केली असल्याचा आरोप केला आहे. परंतु खोटेनाटे आरोप करण्यापूर्वी शहानिशा करुन जिल्हाधिकाऱ्यांशी या संदर्भात बोलणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गात 144 कलम लावणे आवश्यक आहे परंतु ते गणपतीच्या पार्श्वभूमीवर लावले असावे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमध्ये राजकीय हस्तक्षेप करणे योग्य नाही. जन आशीर्वाद यात्रेला किती भाजपचे कार्यकर्ते आले हेही सर्वांनी पाहिले आहे. प्रत्येकाने आपला पक्ष वाढवला पाहिजे आणि प्रत्येकाने प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा सन्मान केला पाहिजे. हीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()