उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात; असा असेल दौरा  

uday samant on sindhudurg district tour tomorrow time table declared
uday samant on sindhudurg district tour tomorrow time table declared
Updated on

सिंधुदुर्गनगरी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उद्या (6) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 6 रोजी दुपारी 1.50 वाजता हेलिकॉप्टरने पोलिस परेड ग्राऊंड, ओरोस - सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने जिल्हा शासकीय रुग्णालय, ओरोस - सिंधुदुर्गकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी भेट देतील. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयत पोहोचतील. 

सिंधुदुर्ग येथे जिल्ह्यातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा घेवून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कडक निर्बंध संदर्भात आढावा बैठक. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे राखीव, दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद, सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून मोटारीने पोलिस परेड ग्राऊंड, ओरोस-सिंधुदुर्गकडे प्रयाण, सायंकाळी 4.15 वाजता पोलिस परेड ग्राऊंड, ओरोस-सिंधुदुर्ग येथे आगमन व हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.