राणेंच्या अटकेमागे प्लॅन नव्हता; व्हायरल व्हिडिओवर करडी नजर

उदय सामंत; कायदेशीर भुमिकेतून पोलिसांची कारवाई
Uday Samant
Uday SamantSakal media
Updated on

रत्नागिरी : नारायण राणे यांच्यावरील कारवाई ही पुर्व नियोजीत प्लॅन होता किंवा कारवाईसाठी दबाव होता, असे काही नाही. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची भुमिका कायदेशीर आणि योग्य होती. त्यामध्ये कोणतीही सुडबुद्धी किंवा दबाव नव्हता. आता कोणाचे व्हिडिओ व्हायरल झाले त्याचा तपास करावा लागले. न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळे त्यावर जास्त बोलने योग्य नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

Summary

राणे यांची अटक हा पुर्व नियोजित कट होता; आशिष शेलार यांचा आरोप

पालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी नगराध्यक्ष बंड्या साळवी, ज्येष्ठ नगरसवक राजन शेट्ये आदी उपस्थित होते. राणे यांची अटक हा पुर्व नियोजित कट होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकला जात होता, असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला. पालकमंत्री अॅड. अनिल परब यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याअनुषंगाने आरोपांचा रोख होता.

Uday Samant
कौटुंबिक नैराश्यातून कोडोलीच्या मायलेकींची आत्महत्या

यावबर बोलाताना उदय सामंत म्हणाले, नारायण राणे यांची अटक ही कायदेशीर प्रक्रिया होती. त्यामध्ये कोणाचाही व्हिडिओ व्हायरल झाला त्याचा तपास करावा लागे, त्याची खात्री करणे गरजे आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त श्री. पांडे यांची भुमिका कायदेशीर रित्या केली. कोणाचाही दबाव नव्हता. या प्रकरणाची सिबिआय चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते आशीष शेलार यांनी केली आहे. यावर सामंत म्हणाले, कायदे तज्ञांनी सांगितले की ती कायदेशीर बाब होती. न्यायलयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यावर बोलने योग्य नाही.

राणे किंवा भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेला अटकाव घालण्यासाठी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे का, यावर सामंत म्हणाले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गणपती, कोरोना आहे. कोरोणाची तिसरी लाट येण्याची शक्यत आहे. कोणाची यात्रा आढवावी किंवा जनआशिर्वाद थांबवावे, यासाठी नाही. जिल्ह्याची परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या अधिकारात घेतलेला हा निर्णय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.