पक्ष सोडल्याप्रमाणे वागणूक मिळाल्यास वेगळा विचार, सामंतांचा इशारा

माझ्या घरच्या ऑफिसमध्ये माझ्यामागे बाळासाहेब, आदित्य या सर्वांचे फोटो आहेत म्हणजे मी सेनेतेच आहे.
Uday Samant
Uday Samantsakal
Updated on
Summary

माझ्या घरच्या ऑफिसमध्ये माझ्यामागे बाळासाहेब, आदित्य या सर्वांचे फोटो आहेत म्हणजे मी सेनेतेच आहे.

रत्नागिरी - शिवसेना सोडल्याप्रमाणे वागणूक मिळत असेल तर मलाही भविष्यात वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा माजी मंत्री, आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले, आम्ही शिवसेनेमध्येच आहोत, जिल्ह्यातील शिवसेना संपेल, असे कृत्य माझ्याकडून होणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उभी करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.

आमदार म्हणून मी पक्ष एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. तरी माझ्यावर टीका झाली. टीकेचा स्तरदेखील सुसंस्कृत असावा. मी शेवटपर्यंत ठाकरे- शिंदे गटाला जोडण्याचा प्रयत्न केला. त्याचे साक्षीदार खासदार विनायक राऊत आहेत; परंतु आम्हाला प्रेमाने विचारणारे तिथे कोणी नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला. दोन महिन्यांत उद्धव ठाकरेंसह सर्वांचा गैरसमज दूर होईल, असे मत व्यक्त केले.

Uday Samant
हिंदुत्वासाठी एकत्र आलाय, मग मंत्रीपदासाठी का भांडताय?, खडसेंचा सवाल

सामंत म्हणाले, माझ्या घरच्या ऑफिसमध्ये माझ्यामागे बाळासाहेब, आदित्य या सर्वांचे फोटो आहेत म्हणजे मी सेनेतेच आहे. मेळावा घेऊन माझ्यावर टीका करणाऱ्या राऊतांचाही फोटोआहे. जाण्यापूर्वी मी सर्व कार्यकर्त्यांना बैठकीत सांगितले होते की, शिवसेनेच्या विरोधात घटकपक्ष कारस्थान करत आहे. त्याला विरोध करण्यासाठी हा उठाव केला आहे. जोडण्याचा प्रयत्न कोणच करत नव्हते. खासदार राऊत त्याचे साक्षीदार आहेत. शेवटच्या दिवशी सकाळी १० ते सायं. ५.३० पर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो.

राष्ट्रीय कार्यकारिणीला मी उपस्थित राहिलो. त्यानंतर आदित्य ठाकरेंना भेटल्यानंतर गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांनी बाडका, गद्दार, अन्नाला न जागणारा अशी टीका केली. पण मी टीका करण्यासाठी आलेलो नाही, अतिवृष्टीचा आढावा घेणार आहे. मदत दिली का? पंचनामे केले का? याची माहिती घेणार आहे. सामंत पुढे म्हणाले की, तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वेळ मागितली होती. त्यांना भेटण्याचा निर्णय मी घेतला.

Uday Samant
सोनिया गांधींनी आपल्याच तिजोरीतून तिस्ता सेटलवाडला दिले पैसे, भाजपचा आरोप

तीन जिल्हा परिषद गटातील पदाधिकाऱ्यांची संख्या केवढी आहे, यातून बोध घेण्याची गरज आहे; पण एकाही व्यक्तीला मी शिवसेनेतून बाहेर आलो, असे सांगितले नाही. आम्ही शिवसेनेमध्येच आहोत. बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. यामध्ये यश येईल; पण १०० टक्के लोकांनी सांगितले की, तुम्ही घेतलेला निर्णय महत्त्वाचा होता. आज मला भेटणाऱ्यांना मी सांगितले, विचलित होऊ नका. शिवसेनेचे काम करतोय, शिवसेनेतच आहोत.

मुख्यमंत्र्यांकडून लगेच कार्यवाही

रत्नागिरीसाठी भरीव काहीतरी देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मला विचारले. तेव्हा मी जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी मागणी केली. विश्वास बसणार नाही. लगेच माझ्याकडे नोटीस आली आहे. मेडिकल कॉलेजसाठी कमिटी नेमली आहे. आठ दिवसांत ती कमिटी शासनाला अहवाल देणार आहे. पुढच्या वर्षी मेडिकल कॉलेज सुरू होईल आणि जिल्ह्यातील डॉक्टरची कमतरता दूर होईल. गेली अनेक वर्षे यासाठी प्रयत्न करत होतो. मुख्यमंत्र्यांनी लगेच त्यावर कार्यवाही केली, असे सामंत म्हणाले.

Uday Samant
शिंदे सरकारचा रोहित पवारांना झटका, कर्जतमध्ये आणलेल्या कामाला स्थगिती

मला सार्थ अभिमान

जिल्ह्यासाठी आता शासकीय विधी महाविद्यालय मंजूर झाले आहे. पुढच्या वर्षी त्याच्या कामाला सुरुवात होईल. एकनाथ शिंदेंच्या कामाची ही पद्धत आहे. बाळासाहेबांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला. त्याला साथ देणाऱ्यामध्ये रत्नागिरीचा एक आमदार आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे सामंत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.