Konkan Politics : शरद पवारांच्या आशीर्वादाने 'या' जागा आम्ही निश्चित जिंकू; आमदार भास्कर जाधवांना विश्वास

'मी कुठूनही लढावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे.'
MLA Bhaskar Jadhav
MLA Bhaskar Jadhavesakal
Updated on
Summary

जिल्ह्यातील पाचही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडून येतील, असा आशावाद आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

चिपळूण : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ आता मजबूत आहे. त्या जोरावर आपण चिपळूणसह जिल्ह्यातील पाचही जागा जिंकू, असा विश्वास आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी व्यक्त केला. वाढती महागाई, बेरोजगारी व मोदी सरकारवर त्यांनी कडाडून हल्ला चढवला.

खेर्डी येथे संस्कृती मंगल हॉलमध्ये शुक्रवारी सायंकाळी खेर्डी पंचायत समिती गणाचा शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. जाधव म्हणाले, सध्या सोशल मीडिया, वृत्तपत्रातील बातम्यांवर जाऊ नका, तर वस्तुस्थिती पाहा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लोकांचा विश्वास वाढत आहे. जनमानसात शिवसेनेला पाठिंबा वाढत असल्याने महाविकास आघाडी मजबूत होत आहे.

MLA Bhaskar Jadhav
Bhogavati Sugar Factory : आमदार पी. एन. पाटलांनी सभासदांचा विश्वासघात केला, त्यांना त्यांची जागा दाखवा; कोणी केलंय आवाहन?

राष्ट्रवादीचे शरद पवारांचे आशीर्वाद आणि तुमची सर्वांची समर्थ साथ, या बळावर आपण चिपळूण-संगमेश्वरची ही जागा निश्चित जिंकू. राष्ट्रवादीसह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव हेही आपल्याबरोबर आहेत, असे त्यांनी सांगितले. या वेळी शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख विनोद झगडे, युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य, विक्रांत जाधव, ऐश्वर्या घोसाळकर, तालुका समन्वयक स्वाती देवळेकर, तालुका संघटक मानसी भोसले आदी उपस्थित होते.

MLA Bhaskar Jadhav
पुसेसावळी दंगलीचे ठोस पुरावे न्‍यायालयात सादर करणार; पोलिस अधीक्षकांनी दिली महत्त्वाची अपडेट, मुस्लिम बांधवांना मिळणार न्याय?

आता संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आपण ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. मी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमासाठी कोल्हापूर, पुणे येथे जाऊन आलो. आता रत्नागिरीकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. मी कुठूनही लढावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे; पण आपण आता जोमाने काम करून खेडमध्ये संजय कदम, गुहागरचे मी बघेन. आमदार राजन साळवी, रत्नागिरीत उमेदवार ठरेल तो व चिपळूणची जागाही आपण जिंकू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

MLA Bhaskar Jadhav
'199 वर्षांनी शिवरायांची ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात येणार'; शिवेंद्रराजेंच्या 'या' मागणीला मुनगंटीवारांची संमती

'संधी मिळाली तर चिपळूणमधून लढू'

जिल्ह्यातील पाचही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडून येतील, असा आशावाद आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आपण संधी मिळाली तर चिपळूणमधून लढणार असल्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.