Uddhav Thackeray: ठाकरे यांचं नाव घेतल्यावर जेवण सुद्धा जात नाही; नारायण राणे यांची कडवट टीका

Narayan Rane's bitter criticism...
Narayan Rane and Uddhav Thackeray
Narayan Rane and Uddhav ThackerayEsakal
Updated on

सिंधुदुर्ग- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राणे यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली. ठाकरे आताच्या सरकारला अनेक गोष्टींबाबत विचारणा करतात, पण त्यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात काय काम केलं ते सांगावं. ठाकरे यांचं नाव घेतल्यावर मला जेवण जात नाही, असं राणे म्हणाले.

नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं. अडीच वर्षात यांनी काय पराक्रम करुन दाखवलाय? किती पर कॅपिटल उत्पन्न वाढवले? जीडीपी किती वाढवली? रोजगार निर्मिती किती केली? गरिबीचे प्रमाण किती कमी केले? कुपोषितपणा किती कमी केला? अशा प्रश्नांचा भडिमार त्यांनी केला.

Narayan Rane and Uddhav Thackeray
वक्तव्य गांभीर्याने केले पाहिजे; वडेट्टीवार-नितेश राणे वादावर मुनगंटीवार यांचं विधान

असले विषय उद्धव ठाकरे यांना कळणार देखील नाहीत. त्यांना काहीही माहिती नसते. खोके आणि ठोके याच्या पलीकडे त्यांना जाता येत नाही. ठाकरे यांचं नाव घेतल्यावर मला जेवण सुद्धा जात नाही, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी यावेळी केली. (union minister narayan rane criticize shivsena Uddhav Thackeray )

Narayan Rane and Uddhav Thackeray
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांच्याकडून नारायण राणेंचा 'चिंधीचोर'असा उल्लेख; कारण...

राणे आणि ठाकरे यांचा वाद सर्वश्रूत आहे. नारायण राणे यांनी सातत्याने ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच काहीवेळा गंभीर आरोप देखील केले आहेत. निलेश राणे आणि नितेश राणे हेदेखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसतात. ठाकरेंची शिवसेना आणि राणे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडताना अनेकदा दिसतात. राणेंच्या वक्तव्यावर ठाकरे गट पलटवार करण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.