पाली : अवकाळी पाऊस व बदलते ऋतुचक्र जिल्ह्यातील पक्षांच्या मुळावर

स्थलांतरित पक्षांची वाताहत, उपासमार, अनेकांचा मृत्यू, पक्षी निरीक्षणाला फटका
पाली, शंतनु कुवेसकर यांनी पाऊस व खराब हवामानामुळे अशक्त होऊन पडलेल्या तिबोटी खंड्याला सुखरूप सोडले.
पाली, शंतनु कुवेसकर यांनी पाऊस व खराब हवामानामुळे अशक्त होऊन पडलेल्या तिबोटी खंड्याला सुखरूप सोडले.sakal
Updated on

पाली : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व बदलते ऋतुचक्रामुळे माणसांसह पशु पक्षांची देखील वाताहत झाली आहे. स्थलांतरित पक्षांची वाताहत झाली आहे. पाकोळी सारख्या शेकडो पक्षांचा मृत्यू झाला आहे. कीटक व सरपटणारे प्राणी असे खाद्य न मिळाल्याने असंख्य पक्षांची उपासमार झालेली पहायला मिळत आहे. शिवाय खराब हवामानामुळे पक्षी बाहेर मुक्त संचार करत नसल्याने पक्षी निरीक्षणाला याचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील काही पक्षी अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणावरून ही बाब समोर आली असून. याबाबत त्यांनी व पक्षी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

हजारो किमीचा प्रवास करून परतीच्या मार्गावर असलेले काही तिबोटी खंडयांना पावसाचा फटका बसला आहे. माणगाव येथील पक्षी अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी पाऊस व वाऱ्यामुळे थकून पडलेल्या तिबोटी खंड्याला काही दिवसांपूर्वी वाचविले आहे. तसेच अमूर ससाण्यांना देखील याचा फटका बसला आहे. गिधाडांच्या व इतर पक्षांच्या घरट्यात पाणी घुसून काही घरटी ढासळली आहेत.

पाली, शंतनु कुवेसकर यांनी पाऊस व खराब हवामानामुळे अशक्त होऊन पडलेल्या तिबोटी खंड्याला सुखरूप सोडले.
औरंगाबाद : बेशिस्त वाहतुकीला राँगसाईडचाही ताप!

पाऊस व उष्णतेमुळे अंड्यांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. काही पक्षांनी या पावसात व बदलत्या वातावरणात अजूनही तग धरला आहे. मात्र हे बदल असेच राहिल्यास त्याचा फटका पक्षांना बसू शकतो. सतत पाऊस असल्याने गवतावरील कीटक उडत नव्हते त्यामुळे हवेतल्या हवेत उडत या कीटकांची शिकार करणाऱ्या पाकोळी सारख्या पक्षांची उपासमार झालेली पहायला मिळाली त्यात अचानक पडलेली थंडी परिणामी यातील असंख्य पक्षी उपासमारीने थकून खाली कोसळून मृत झाले.

हिरमोड

पक्षांना अन्न उपलब्ध होण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश लागतो. तसेच कीटक व सरपटणारे प्राणी लागतात. मात्र या दोन्ही गोष्टी उपलब्ध होत नसल्याने पक्षी मुक्त संचार करतांना दिसत नाही आहेत. परिणामी सकाळी व सायंकाळी पक्षी दर्शनासाठी व त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपडणाऱ्या हौशी पक्षी प्रेमींचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हिरमोड झालेला दिसून येत आहे.

जीवनक्रम बदल

नोव्हेंबर ते मार्च हा शिकारी पक्षांचा विणीचा हंगाम असतो, या पक्षांची घरटी उंच झाडांवर असतात. अवकाळी पावसामुळे या पक्षांना घरटी बांधणे अवघड झाले आहे. यामुळे त्यांच्या जीवनचक्रात निश्चितच बदल होताना दिसून येत आहे.

पाली, शंतनु कुवेसकर यांनी पाऊस व खराब हवामानामुळे अशक्त होऊन पडलेल्या तिबोटी खंड्याला सुखरूप सोडले.
नाशिक : भाजपकडून निवडणुकीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण

हवामान बदलाचा परिणाम पक्षांवर अधिक प्रमाणात दिसून येत आहे. काही स्थलांतरित पक्षांनी कोकणात (जिल्ह्यात)स्तलांतरण करून येणे अद्यापही सुरु केले नाही. तर काही जून मध्ये हजारो किलोमीटर वरून स्थलांतर करून आलेले पक्षी अद्यापही काही प्रमाणात इथेच थांबलेले दिसून येत आहेत. त्यातच ढगाळ हवामान आणि पावसामुळे पक्षांना अन्न उपलब्ध होणे कठीन झाल्याने त्यांची उपासमार होतांना दिसून येत आहे.

- राम मुंढे, पक्षी अभ्यासक व निरीक्षक

हवेतल्या हवेत जे पक्षी खाद्य खातात त्यांना खाद्य न मिळाल्याने त्यांची एक ते दोन दिवस उपासमार झाली असेल व त्यात अचानक पडलेली थंडी विशेषतः पाकोळीला याचा अधिक फटका बसला. पावसामुळे काही पक्षांची घरटी खराब होण्याची शक्यता आहे. स्थलांतरामध्ये असणाऱ्या पक्षांना पाऊस व बदलत्या वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांचे मार्ग बदलू शकतात व ते भरकटू शकतात.

- शंतनु कुवेसकर, पक्षी अभ्यासक व निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.