Shortage of Urea Fertilizer : रायगडमध्ये युरियाचा तुटवडा, शेतकरी अडचणीत; काँग्रेसकडून आरसीएफला पत्र

Fertilizer Shortage Agriculture News | सध्या भाताचे पीक तरारून आले असून खताची मात्रा देणे आवश्यक आहे. यासाठी कृषी केंद्रावर खत विकत घेण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे.
urea shortage in raigad farmers in trouble Letter from Congress to RCF agriculture
urea shortage in raigad farmers in trouble Letter from Congress to RCF agricultureSakal
Updated on

Raigad News : रायगड जिल्ह्यात सध्या युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन शेतीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या या अडचणीबाबत प्रदेश काँग्रेस सेक्रेटरी ॲड. प्रवीण ठाकूर यांनी शासनाला व आर. सी. एफ. ला पत्र लिहून या परिस्थितीमधून तत्काळ मार्ग काढण्याची मागणी केली आहे.

सध्या भाताचे पीक तरारून आले असून खताची मात्रा देणे आवश्यक आहे. यासाठी कृषी केंद्रावर खत विकत घेण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. वेळेत युरिया खताचा पुरवठा न झाल्यास भातशेतीचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये हा प्रत्यय येत आहे.

यंदा चांगला पाऊस झाला आहे. सर्वत्र भाताची रापे चांगली आली आहेत, मात्र जिल्‍ह्यात मागील काही दिवसांपासून खतविक्रेत्यांकडे युरिआ खताचा साठा उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधव त्रस्‍त झाले आहेत. रायगड जिल्‍ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखळे जाते. मात्र खताच्या तुटवडा असल्‍याने नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

urea shortage in raigad farmers in trouble Letter from Congress to RCF agriculture
Urea Fertilizer : युरियाची कृत्रिम टंचाईमागे विक्री व्यवस्थापन; किरकोळ खत विक्रेत्यांवर अनावश्यक उत्पादनांची सक्ती

कृषिदूतांतर्फे कीटकांविषयी माहिती

महाड : महाड जवळील आचळोली येथील भैरवनाथ निसर्ग मंडळ संचालित कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी शिरसवणे गावात ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत घातक कीटकांची ओळख व माहिती शेतकऱ्यांना करून दिली. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यावेळी मधमाशी, चित्रांग भुंगेरा, नाकतोडा, फुलपाखरे, रेशीम कीडा, टोळ, वाळवी आदीची माहिती देण्यात आली.

जिल्ह्यात मागणीनुसार खताचा वाटप केलेला आहे. सध्या १९०० मेट्रिक टन खत दुकानदारांकडे शिल्लक आहे. ज्या भागात खताचा तुटवडा जाणवत असेल, त्या ठिकाणी खतपुरवठा सुरळीत केला जाईल. यासाठी आढावा घेतला जात आहे.

- वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.