रत्नागिरी : संतुलन मानसिक आरोग्य केंद्राने सुमारे 15-16 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या हेल्पलाइनमुळे लॉकडाऊनच्या काळात रुग्णांना चांगलाच फायदा झाला. ‘संतुलन’मध्ये येणार्या 2003 पुढील सर्व रुग्णांची पूर्ण माहिती कॉम्प्युटरवर उपलब्ध असते, त्यामुळे त्या रुग्णाशी मोबाईलवर संवाद साधून आम्ही त्याला मार्गदर्शन करतो. लॉकडाऊनच्या काळात या हेल्पलाईनचा वापर खूपच उपयुक्त ठरला आहे.
दिवसा डॉ. शाश्वत शेरे आणि रात्रीच्या वेळेत डॉ. स्नेहल अंधारे या मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात हे माहित असल्याने रुग्णांना मोठा दिलासा ठरतो.कोकणासारख्या दुर्गम भागातील रुग्णांना या अडचणी पूर्वीही होत्या. अशा रुग्णांना बारिक सारीक तक्रारींसाठी रत्नागिरीला यावे लागू नये म्हणून संतुलन तर्फे 24 तास हेल्पलाईन पूर्वीपासूनच सुरू होती.
डाटाआधारे मोबाईलवरून मार्गदर्शन; ‘संतुलन’ची परंपरा
खंबीर मनाच्या लोकांचीही प्रमुख समस्या म्हणजे माझ्यासमोर अचानक आलेल्या या रिकाम्या वेळाचे नेमके काय करायचे. आजपर्यंत ‘वेळ मिळत नाही’ या सबबीवर अनेक गोष्टी करायच्या आपण टाळत होतो. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, आपले घरातले कामाचे टेबल, ड्रॉवर आवरणे, कपड्यांचे कपाट आवरणे, घराची चांगली साफसफाई करणे, घरातील सामानाची रचना बदलणे, पाकक्रियेच्या पुस्तकातून किंवा यू-ट्यूबवरुन नव्या पदार्थांच्या रेसिपी शोधून तसं काही नविन बनविणे,
कपडे इस्त्री करणे, कपडे स्वच्छ धुणे, भांडी घासणे या अनेक घरगुती कामांसाठी आपल्याकडे वेळच नसायचा. मनातले अन्य विचार दूर ठेऊन कामामध्ये अधिक सफाई कशी येईल यावर लक्ष एकाग्र केले तर त्यामुळे अधिक फ्रेश वाटू शकते. कारण ती एक ‘माईंडफुलनेस’ ध्यानाची अवस्था बनून जाते.
एखादे नवीन पुस्तक वाचणे, छानसा चित्रपट सलग पहाणे, कॅरम, बुद्धिबळ असे खेळ खेळणे, कोडी सोडवणे असे अनेक छंद आहेत. जी गोष्ट करतांना तुम्ही वेळेचे भान विसरून जाता, ती तुम्हाला तणावमुक्त करणारा महत्वाचा छंद असतो, असे डॉ. शेरे यांनी सांगितले.
मानसिक ताण कमी करा
लॉकडाऊनचे नियम पाळणे तुमच्या स्वत:साठीच नाही तर तुमचे कुटुंबीय, गावकरी आणि सर्व देश, किंबहुना सर्व जगाच्या दृष्टीने कसे फायद्याचे आहे हे आम्ही या हेल्पलाईनद्वारे लोकांना पटवून देण्याचे काम करीत असतो. मानसिक ताण जेवढा कमी तेवढी रोग प्रतिकारक शक्ती अधिक वाढते हे आवर्जून सांगतो, असे डॉ. शेरे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.