कोकण रेल्वेमार्गावर युटिलिटी व्हेईकलला आग; वाहतूकीवर परिणाम

सुमारे दोन तास रेल्वे गाड्या जवळच्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या.
कोकण रेल्वेमार्गावर युटिलिटी व्हेईकलला आग; वाहतूकीवर परिणाम
Updated on

रत्नागिरी : विद्युतीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्यांनी युटिलिटी व्हेईकलला (साहित्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोच) (utility vehicle coach) अचानक आग (fire news) लागल्याचा प्रकार आज सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे (konkan railway route) मार्गावर झाराप जवळ घडला. त्यामुळे सुमारे दोन तास रेल्वे गाड्या जवळच्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या.

कोकण रेल्वे मार्गावर सध्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. रत्नागिरी ते मडगांव पर्यंतचे काम सध्या सुरु असून त्याच्यासाठी साहित्य नेणारी टॉवर वॅगन या मार्गांवर कार्यरत आहे. आज सकाळी ही गाडी झाराप नजीक असताना अचानक त्यामधून धूर येऊ लागला. हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर आग विझवण्यासाठी प्रयत्न सूरू झाले. जवळच्या अग्निशमन यंत्रणेला कळवण्यात आले. हा प्रकार घडल्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्या (kokan railway station) जवळच्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये तुतारी (tutari express) कुडाळला तर मांडवी झाराप येथे थांबवून ठेवली होती.

कोकण रेल्वेमार्गावर युटिलिटी व्हेईकलला आग; वाहतूकीवर परिणाम
प्रशासनाच्या तंबीनंतर रत्नागिरीतील खासगी रुग्णालये वठणीवर

रुळावर आग लागलेला हा कोच पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली होती. अग्निशमन बंबाच्या साह्याने आग विझवण्यात आली. तोपर्यंत आतील सर्व साहित्य जळून गेले होते. हा मार्ग मोकळा करण्यासाठी सुमारे दोन तासाचा कालावधी लागला. आग लागलेला कोच बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली. 11. 40 वाजता थांबवून ठेवलेल्या गाड्या पुन्हा मार्गस्थ झाल्या. यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. ही आग कशी लागली याचे कारण समजू शकलेले नाही. याची चौकशी रेल्वे प्रशासन करणार असल्याचे समजते.

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ-झाराप रेल्वे स्टेशनच्या मध्ये असलेल्या तेर्सेबांबर्डे गेटजवळ विजेचं काम करणाऱ्या स्पेशल गाडीला आग लागली. तेर्सेबांबर्डे गेटजवळ कोकण रेल्वे मार्गावर हे काम सुरु असताना कोकण रेल्वेच्या काम करणाऱ्या बोगीला अचानक आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी कुडाळ एमआयडीसी, सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. या लागलेल्या आगीत बोगीचे आणि दुरुस्ती साहित्याचे नुकसान झाले आहे. कोकण रेल्वेच्या मुख्य मार्गावर ही घटना घडल्याने राजधानीसह, जनशताब्दी, मांडवी या रेल्वे खोळंबल्या असून कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे.

कोकण रेल्वेमार्गावर युटिलिटी व्हेईकलला आग; वाहतूकीवर परिणाम
दिव्यांग रुपेश यांच्या जिद्दीला सलाम! गादी वाफ्यावर केली भात पेरणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.