वेळास किनाऱ्यावरही कासवांची चाहूल!

on velas beatch tortotise nest seen its good news in ratnagiri
on velas beatch tortotise nest seen its good news in ratnagiri
Updated on

मंडणगड (रत्नागिरी) : कासवांचे गाव अशी ओळख मिळालेल्या वेळास समुद्रकिनाऱ्यावरून या वर्षाच्या हंगामातील पहिले घरटे सापडले. कासवांची पुन्हा चाहुल लागल्याने पर्यावरणप्रेमी आनंदले असून घरट्यातील 146 अंडी संरक्षित केली आहेत. निसर्ग चक्रीवादळात उद्‌ध्वस्त झालेल्या वेळासला समुद्र व किनाऱ्यातील निसर्गचक्र सुरळीत होत असल्याच्या दृश्‍य परिणामाने दिलासा मिळाला. 

2002 पासून वेळास किनाऱ्यावर समुद्री कासवांच्या संवर्धनाचे काम चालू आहे. निसर्ग वादळात निसर्गरम्य वेळास पूर्णतः उद्‌ध्वस्त झाले. किनाऱ्यावरील वाळूतील सुरूचे बन जमीनदोस्त झाले. याच परिसरात ऑलिव्ह रिडले जातीची कासवे नोव्हेंबरमध्ये आपली अंडी घालण्यासाठी येतात; मात्र यावर्षी जानेवारी महिना सुरू झाला तरी ही कासवे फिरकली नव्हती. त्यामुळे पर्यावरणप्रेमी चिंतित होते. 6 जानेवारीला या हंगामातील पहिले घरटे सापडल्याचे कासवमित्र वीरेंद्र पाटील यांनी सांगितले. 

22 घरट्यांतून.. 2,715 अंडी सुरक्षित 

2020 मध्ये 1 हजार 90 कासवांची पिल्ले समुद्राकडे झेपावली. त्यात संरक्षित केलेल्या किनाऱ्यावरील एका नैसर्गिक घरट्यातून 81 पिल्ले बाहेर येत समुद्रात झेपावली. किनाऱ्यावरील हॅचेरीत 22 घरट्यांतून सापडलेली 2,715 अंडी सुरक्षित केली होती. 

अंडी शोधून कासव मित्रांकरवी हॅचेरीत 

नोव्हेंबर ते मार्च या काळात दररोज पहाटे संवर्धनाचे काम कासवमित्रांनी केले. कासवांनी किनाऱ्यावर केलेल्या एक विशिष्ट प्रकारच्या नक्षीचा माग काढत, ही घरटी शोधण्यात आली. घरटे सापडल्यानंतर त्या घरट्याचा आकार, त्यांची खोली, लांबी याच्यासह घरट्यातल्या अंड्याची नोंद केल्यानंतर ही अंडी हलक्‍या हाताने कासव संवर्धन केंद्रात म्हणजे किनाऱ्यावरील हॅचेरीत आणून सुरक्षित करण्यात येतात. 


एक दृष्टिक्षेप

  • निसर्ग वादळामध्ये उद्‌ध्वस्त झाले होते वेळास 
  • वाळूतील सुरूचे बनही झाले होते जमीनदोस्त 
  • येथेच ऑलिव्ह रिडले कासवे नोव्हेंबरात घालतात अंडी 
  • यंदा जानेवारी सुरू झाला तरी ही कासवे नव्हती फिरकली 
  • 6 जानेवारीला मात्र या हंगामातील सापडले पहिले घरटे 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.