मोखाड्याचा पाणी टंचाईचा वनवास संपला! तालुक्यात तब्बल 50 हजार 494 नागरिकांसह जनावरांना टँकरद्वारे पाणी पुरवठा

स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोखाडा तालुक्याला प्रतिवर्षी पाणी टंचाई भेडसावत आहे.
Mokhada Water Shortage
Mokhada Water Shortageesakal
Updated on
Summary

जानेवारी महिन्यात शासनाने मोखाड्यात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. उन्हाच्या तडाख्याने दिवसागणिक टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढत गेली.

मोखाडा : स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोखाडा तालुक्याला प्रतिवर्षी पाणी टंचाई (Mokhada Water Shortage) भेडसावत आहे. यंदा डिसेंबर 2023 पासूनच मोखाड्यात पाणी टंचाई निर्माण झाली. त्यानंतर प्रशासनाने जानेवारी 2024 मध्ये टंचाईग्रस्त गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा (Water Supply Through Tankers) सुरू केला. टंचाईग्रस्त भागाची तहान भागवण्यासाठी, पहाटे पासूनच पाणी पुरवठा करणारे टॅंकर धरणाची वाट धरायचे. जूनच्या अखेरीस तालुक्यात मान्सूनचे आगमन झाले. परिणामी, विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे सरकारी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा बंद करण्यात आला आणि टंचाईला ब्रेक लागला.

तब्बल सात महिने मोखाड्यातील नागरिकांनी पाणी टंचाईचे चटके सोसले आहेत. जानेवारी महिन्यात शासनाने मोखाड्यात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. उन्हाच्या तडाख्याने दिवसागणिक टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, म्हणून पहाटे 4 वाजेपासून टॅंकर पळसपाडा आणि अप्पर वैतरणा धरणातून पाणी आणण्यासाठी धावत होती. तर, नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचा दिलीप सोनार हा कर्मचारी नियोजनबध्द कारभार पाहत होता.

Mokhada Water Shortage
महाजन आयोगावरील 'हा' धडा शाळेच्या अभ्यासक्रमात; वाद होण्याची शक्यता, कर्नाटक सरकारकडून चुकीची माहिती समाविष्ट

गतसालच्या तुलनेने यंदा टंचाईची तिव्रता अधिक होती. त्यामुळे टॅंकर चालक आणि प्रशासनाला, नागरिकांची तहान भागवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे. प्रतिवर्षी जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात मोखाड्यात पाणी टंचाईला सुरूवात होते. यंदा एक महिना अगोदरच डिसेंबरमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. गतसाली 23 टॅंकरद्वारे 73 गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. यंदा 26 टॅंकरद्वारे 88 गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे.

तालुक्यात कधी नव्हे एवढ्या सुमारे 50 हजार 494 नागरिक आणि जनावरांची जून अखेरपर्यंत टॅंकरच्या पाण्याने तहान भागवली गेली आहे. तब्बल 7 महिने मोखाडावासियांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागले आहेत. आता नियमित मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पाणी टंचाईचे संकट टळले आहे. त्यामुळे दररोज पहाटे 4 वाजेपासून धावणारे टॅंकर 30 जूनपासून स्थिरावले आहेत आणि यंदाच्या पाणी टंचाईचा मोखाडावासियांचा वनवास संपला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.